भाजपाने घातले आयुक्तांना साकडे

By Admin | Updated: February 13, 2017 01:48 IST2017-02-13T01:48:40+5:302017-02-13T01:48:40+5:30

मतदारयादीत दुबार मतदारांची संख्या मोठी असून ती नावे मतदार यादीतून वगळण्यात यावीत, एक हजार मतदारांसाठी एक मतदान केंद्र असावे,

BJP-appointed commissioner | भाजपाने घातले आयुक्तांना साकडे

भाजपाने घातले आयुक्तांना साकडे

पुणे : मतदारयादीत दुबार मतदारांची संख्या मोठी असून ती नावे मतदार यादीतून वगळण्यात यावीत, एक हजार मतदारांसाठी एक मतदान केंद्र असावे, मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रयत्न करावेत, मतदार यादीतील पत्ते व्यवस्थित करावेत, आदी मागण्यांसाठी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपाच्या शिष्टमंडळाने आयुक्त कुणाल कुमार यांची भेट घेतली. यावेळी शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार जगदीश मुळीक, माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी उपस्थित होते.
भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी २० वासुदेवांचा संघ पक्षाकडून तयार करण्यात आला आहे. दररोज सकाळी ६ ते १० या वेळेत शहराच्या विविध भागांमध्ये जाऊन वासुदेव पारंपरिक पद्धतीने गाणी म्हणून मतदारांनी भाजपाला मतदान करावे, याचे आवाहन करणार आहेत.
पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतिदिनानिमित्त शहरातील ४१ प्रभागांमध्ये समर्पण दिन साजरा करण्यात आला. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.(प्रतिनिधी)

Web Title: BJP-appointed commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.