भाजपाकडून नेहमीच महिलांचा अनादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:14 IST2021-07-07T04:14:01+5:302021-07-07T04:14:01+5:30

पुणे : भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा काँग्रेसच्या शहर शाखेने निषेध केला. भाजपाकडून ...

BJP always disrespects women | भाजपाकडून नेहमीच महिलांचा अनादर

भाजपाकडून नेहमीच महिलांचा अनादर

पुणे : भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा काँग्रेसच्या शहर शाखेने निषेध केला.

भाजपाकडून महिलांचा नेहमीच अनादर केला जातो, अशी टीका यावेळी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली. सोनिया गांधी यांच्या विरोधात भाजपाने दिलेल्या घोषणा त्यांची लायकी दाखवतात, हीच त्यांची संस्कृती व हाच त्यांचा इतिहास आहे, असे जोशी काँग्रेस भवनमध्ये झालेल्या निषेध सभेत म्हणाले.

शहराध्यक्ष रमेश बागवे यांनीही ही महाराष्ट्राची परंपरा नसल्याचे भान भाजपाने ठेवावे असे सांगितले. सभेत भाजपाच्या निषेधाचा ठराव मंजूर करण्यात आला. प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, संजय बालगुडे, कमल व्यवहारे, महापालिका गटनेते आबा बागुल, दत्तात्रय बहिरट, रवींद्र धंगेकर, अजित दरेकर, अविनाश बागवे, रफिक शेख, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, वीरेंद्र किराड, अमीर शेख, कैलास कदम, मुख्तार शेख, सचिन तावरे, सोनाली मारणे, विशाल मलके, राहुल शिरसाट, मंजूर शेख, भूषण रानभरे आदी उपस्थित होते.

Web Title: BJP always disrespects women