शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल २१ दिवस मृत्यूशी दिलेली कडवी झुंज अखेर अपयशी;तिसऱ्या कबड्डीपट्टूचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 18:11 IST

कळंब येथील महाराणा कबड्डी संघातील खेळाडुंच्या तवेरा गाडीला विजापूर येथे दि. १७ मार्च रोजी पहाटे ५ च्या सुमारास भीषण अपघात झाला होता.

बारामती: कर्नाटक येथील विजापूर जिल्ह्यात पंधरा दिवसापूर्वी कबड्डीच्या खेळाडूंच्या वाहनाचा अपघात झाला होता. या अपघातातील गंभीर जखमी असणारा खेळाडू वैभव मोहिते (रा. कळंब) याचे मंगळवारी (दि. ६) सकाळी आठच्या दरम्यान पुणे येथे खासगी रूग्णालयात उपचार दरम्यान निधन झाले. वैभवने २१ दिवस मृत्यूशी झुंज दिली.

याआधी महादेव आवटे व सोहेल सय्यद या दोन खेळाडूंचा अपघाता दरम्यान मृत्यू झाला असनाताच आता वैभवचा देखील मृत्यू झाल्याने कळंब परिसरावर शोककळा पसरली आहे. 

कळंब येथील महाराणा कबड्डी संघातील खेळाडुंच्या तवेरा गाडीला विजापूर येथे दि. १७ मार्च रोजी पहाटे  ५ च्या सुमारास अपघात झाला होता. या अपघातामध्ये महादेव आवटे (रा. भवानीनगर), सोहेल सय्यद (रा. कळंब) या दोघांचा मृत्यू झाला. कब्बडी खेळाच्या प्रेमापोटी हे खेळाडू अगदी शेतमजुरी करून उपजिविका करीत राष्ट्रीय पातळीपर्यंत नावाजले गेले होते.

या अपघातामधून सुदैवाने बचावलेल्या मात्र गंभीर जखमी झालेल्या वैभव मोहिते याच्यावर दर्जेदार उपचार करण्यासाठी पुणे येथील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले होते. वैभवचे वडील बापू मोहिते यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. उपचाराचा खर्च देखील मोठा असल्याने त्यांच्यावर संकट ओढावले होते. त्यामुळे आर्थिक मदतीसाठी आवाहन देखील कब्बडीपट्टू व क्रीडा प्रेमींनी केले होते. मात्र २१ दिवस मृत्यूशी सुरू असलेली वैभवची झुंज अखेर थांबली. मंगळवारी (दि. ६) सकाळी आठच्या दरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.-------------------

टॅग्स :BaramatiबारामतीDeathमृत्यूAccidentअपघात