शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

पुण्यात ‘बिम्सटेक’चा पहिला लष्करी युध्द सराव सुरू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 17:55 IST

दहशतवाद सर्व जगाची गंभीर समस्या आहे. त्याच्या विरोधात लढण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन केले आहे.

ठळक मुद्देनेपाळकडून ऐनवेळी माघार; पाचच देशांचा सहभाग सदस्य राष्ट्रांच्या राष्ट्रध्वजांना चिताह या हेलिकॉप्टरच्या फ्लाइंग पासच्या माध्यमातून सलामी

पुणे : बे आॅफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अ‍ॅँण्ड इकॉनॉमिक को-आॅपरेशन (बिम्सटेक) च्या वतीने दहशतवादाचा सामना करण्यासाठी पुण्यात ‘मिलेक्स १८ या पहिल्या लष्करी युध्द सराव घेण्यात येत आहे. त्याचा  प्रारंभ आज (दि.१०) औंध येथील मिलिटरी स्टेशनवर मराठा लाइट इंन्फ्रटीचे प्रमुख मेजर जनरल संजीव शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू झाला. दरम्यान, या सरावात सहभागी न होण्याचा निर्णय नेपाळने ऐनवेळी घेतला. या सरावात सहभागी न होण्याचे ठोस कारण अद्याप समोर आलेले नाही.  सदस्य राष्ट्रांच्या लष्करी तुकडयांचा सहभाग असलेल्या संचलनाचे नेतृत्व गोरखा बटालियनच्या गौरव शर्मा यांनी केले. आजपासून पुढील सहा दिवस हा सराव असणार आहे. येत्या १६ सप्टेंबर रोजी या सरावाचा समारोप होईल. याप्रसंगी भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत, रक्षा राज्यमंत्री सुभाष भामरे, सर्व सहभागी राष्ट्रांचे लष्करप्रमुख उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी मेजर जनरल शर्मा म्हणाले, दहशतवाद हा सर्व जगाची गंभीर समस्या आहे. त्याच्या विरोधात लढण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन केले आहे. त्याचा दहशतवादाचा सामना करण्यासाठी नक्कीच फायदा होईल. या लष्करी सरावात भारत, भूतान, बांग्लादेश, म्यानमार आणि श्रीलंका या राष्ट्रांच्या सैनिकी तुकडयांचा सहभाग आहे. थायलंडतर्फे एक निरीक्षक तुकडी सहभागी झाली असून, ते प्रत्यक्ष युद्ध सराव न करता केवळ निरीक्षण करणार आहेत. प्रत्येक देशाकडून ३० जणांची तुकडी यात सहभागी झाली आहे. ----------- नेपाळचा सहभाग नसल्याने अनेक तर्कवितर्क या युध्द सरावात नेपाळही सहभागी होणार होता. परंतु, ऐनवेळी त्यांनी यातून माघार घेतली. बिम्सटेकच्या स्थापनेवेळी लष्करी सरावाचा करार झाला नव्हता. त्यामुळे यात सहभागी होऊ शकत नाही, असे नेपाळकडून सांगण्यात आले आहे. परंतु, या सरावात त्यांचे अधिकारी निरीक्षक म्हणून सहभागी होणार आहेत. नेपाळच्या या भूमिकेमागे चीनचा दबाव असल्याचेही बोलले जात आहे. ---------------  हेलिकॉप्टरद्वारे सलामी लष्कराच्या महार रेजीमेंटच्या बॅण्डपथकाद्वारे सादर केलेल्या कदम कदम बढाए जा या गाण्याच्या चालीवर जवानांकडून संचलन केले. तसेच बिम्सटेक संघटनेच्या सदस्य राष्ट्रांच्या राष्ट्रध्वजांना चिताह या हेलिकॉप्टरच्या फ्लाइंग पासच्या माध्यमातून सलामी देण्यात आली.  

टॅग्स :PuneपुणेIndian Armyभारतीय जवानBhutanभूतानMyanmarम्यानमार