पुढील महिन्यातही येणार वाढीव बिले
By Admin | Updated: May 23, 2016 01:46 IST2016-05-23T01:46:35+5:302016-05-23T01:46:35+5:30
सांगवी महावितरण विभागातील अनागोंदी कारभाराचा फटका नागरिकांना, ग्राहकांना बसत आहे. याही महिन्याचे रिडिंग वेळेवर न घेतल्याने नागरिकांना पुढील महिन्यात वाढीव बिले मिळणार आहेत

पुढील महिन्यातही येणार वाढीव बिले
सांगवी : सांगवी महावितरण विभागातील अनागोंदी कारभाराचा फटका नागरिकांना, ग्राहकांना बसत आहे. याही महिन्याचे रिडिंग वेळेवर न घेतल्याने नागरिकांना पुढील महिन्यात वाढीव बिले मिळणार आहेत. तसेच वाकड परिसरात वीजबिलांचे वाटप झाले नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. नागरिकांना वेठीस धरणाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
सांगवी महावितरण कार्यालयाच्या अंतर्गत सुमारे दीड लाख ग्राहक आहेत. या कार्यालयांतर्गत थेरगाव, वाकड, सांगवी, हिंजवडी परिसराचा समावेश आहे. वीज मीटरचे रिडिंग घेणे आणि वीजबिलांचे वाटप करण्याचे काम खासगी संस्थांना दिले आहे. मात्र, या कामांवर अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने त्याचा त्रास ग्राहकांना होत आहे. फेब्रुवारी महिन्यापासून रिडिंग घेणे आणि ते निर्धारित वेळेत अपलोड करणे या कामात अनियमितता असल्याने परिणामी मार्च, एप्रिल महिन्यांची बिले दहा ते पंधरा दिवसांनी वाढीव आली आहेत. याबाबत महावितरणचा शॉक असे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर वाढीव बिले कशी आली, हे पुराव्यासह ‘लोकमत’ने उघडकीस आणले होते. लोकमतचे वृत्त आणि नागरिकांच्या तक्रारींमुळे सांगवीतील कार्यालयात वीज बिल दुरुस्तीसंदर्भात फलक लावण्यात आला आहे. चाळीस दिवसांचे रिडिंग आले, ही चूक त्यांनी झालेली चूक कबूल केली आहे. विभागानुसार रिडिंग घेण्यासाठी कालावधी निश्चित केला आहे. मे महिन्याचे रिडिंगही वेळेवर आलेले नाही. पाच ते पंधरा दिवसांचा विलंब त्यास झालेला आहे. त्यामुळे पुढील महिन्यातही वाढीव दराने बिले येणार आहेत. (वार्ताहर)वीज बिलांचे वाटप नाही
काटेपुरम परिसर, कृष्णा चौक, नवी सांगवी, जुनी सांगवी, पिंपळे निलख, पिंपळे गुरव, विशालनगर या भागांचा समावेश या कार्यालयात आहे. वाकड, ताथवडे परिसरात महिना संपला, तरी वीजबिलांचे वाटप झालेले नाही. तसेच बिले वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. त्यामुळे दररोज शंभर ते दोनशे तक्रारी कार्यालयात येतात. वादावादी होण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे डुप्लिकेट बिले घेण्याचे प्रमाण वाढले आहे.वाढीव बिलांची चूक केली कबूल
४सांगवी कार्यालयात ग्राहकांच्या तक्रारी वाढल्याने फलक लावलेला आहे. त्यावर वाकड, ताथवडे, हिंजवडी भागातील ग्राहकांना कळविण्यात येते की, एप्रिल महिन्यापासून रिडिंग घेणारी एजन्सी बदलल्याने विजेची बिले तीस दिवसांऐवजी चाळीस दिवसांची आली आहेत. पुढील महिन्यापासून वेळेत बिले देण्यात येतील, अशी सूचना कार्यकारी अभियंता यांनी कार्यालयात लावलेली आहे. चूक कबूल झाली असली, तरी वाढीव बिले मिळाली, त्यांचे काय, याचे उत्तर कोणाकडेही नाही. बिलामागे मिळतात चार रुपये
४वीजबिलांचे रिडिंग हे फोटोच्या साह्याने घेतले जाते. मीटरचा फोटो काढणे, बिल तयार करून नागरिकांना देणे या कामासाठी महावितरणकडून मोबदला देण्यात येतो. मीटरचे छायाचित्र घेण्यासाठी तीन रुपये आणि वीजबिल वाटपासाठी एक रुपया असे चार रुपये संबंधित संस्थेला देण्यात येतात. मात्र, या संस्थांवर अधिकाऱ्यांचा वचक नसल्याने त्याचा त्रास ग्राहकांना होत आहे.