पालिका मिळकतींचे कोट्यवधी थकले
By Admin | Updated: March 26, 2015 00:06 IST2015-03-26T00:06:31+5:302015-03-26T00:06:31+5:30
उत्पन्न घटल्याने चिंतेत असलेल्या पुणे महापालिकेच्या ६०० मिळकतींच्या भाड्याची कोट्यवधी रुपयांची थकबाकी असल्याचे उजेडात आले आहे.

पालिका मिळकतींचे कोट्यवधी थकले
दीपक जाधव ल्ल पुणे
उत्पन्न घटल्याने चिंतेत असलेल्या पुणे महापालिकेच्या ६०० मिळकतींच्या भाड्याची कोट्यवधी रुपयांची थकबाकी असल्याचे उजेडात आले आहे. वाहनतळ, भूमी, भवन व सदनिका मिळून एकूण ६०० मिळकतींची ४ कोटी ७४ लाख ४३ हजार रुपयांची थकबाकी आहे.
महापालिकेच्या मोक्याच्या ठिकाणच्या ६०० मिळकती नाममात्र भाड्याने ५४७ व्यक्ती व संस्थांना भाड्याने देण्यात आल्या आहेत. तरी नाममात्र भाडेही भरण्यास या भाडेकरूंकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वसामान्यांची मिळकतकराची काही हजारांची थकबाकी असली तरीही त्यांच्या घरी बँडबाजा घेऊन जाऊन त्याची वसुली करणाऱ्या महापालिका प्रशासनाने मिळकतींच्या थकबाकीदारांबाबतही कडक धोरण स्वीकारण्याची गरज आहे.
भवन विभागाकडील मिळकतींचे सर्वाधिक थकबाकीदार आहेत. व्यावसायिक गाळे, सदनिका, व्यायामशाळा, जलतरण तलाव या १०० मिळकतींची २ कोटी ४२ लाख रुपयांची थकबाकी आहे. भूमीच्या ९१ मिळकतींची ४७ लाख, ३७५ सदनिकांची ८८ लाख रुपये थकबाकी आहे. शहरात पालिकेचे ३४ वाहनतळ आहेत. त्यांपैकी महात्मा फुले मंडई, गुलटेकडी, शिवाजीनगर जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व रंगमंदिर, मनपा भवन टपळे गॅरेज या ६ वाहनतळांच्या ठेकेदारांकडे ६ लाख ५ हजार रुपयांची थकबाकी आहे.
मिळकतींच्या भाड्याबरोबरच सेवाकराचीही मोठी थकबाकी आहे. भूमी, भवन, सदनिका, वाहनतळ यांच्या थकबाकीदारांकडून एकूण ३५ लाख २० हजार ७३१ रुपयांचे पालिकेला येणे आहे. राज्य शासनाने एलबीटी बंद करण्याची घोषणा केल्यापासून पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. राज्यशासनाच्या अनुदानावर महापालिकांना अवलंबून राहावे लागणार आहे. ही थकबाकी वसूल करण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
...तर मिळकती सील करणार
महापालिकेकडून भाड्याने मिळकती घेतलेल्या थकबाकीदारांनी ३१ मार्च २०१५ च्या आत थकबाकी भरावी; अन्यथा संबंधितांना नोटिसा पाठवून करारानुसार मिळकती सील करण्याची कारवाई केली जाईल. तरी तातडीने ही थकबाकी भरण्यात यावी.
- सतीश कुलकर्णी, मालमत्ता व व्यवस्थापन विभागाचे प्रमुख
शहरातील विभागनिहाय थकबाकीदार
विभागमिळकतींची संख्याभाडे थकबाकीसेवाकर थकबाकी
भूमी९१४७ लाख ४८ हजार८ लाख ४३ हजार
भवन१००२ कोटी ४२ लाख२६ लाख ७७ हजार
सदनिका३७५८८ लाख ८१ हजार -
वाहनतळ३४६० लाख ५ हजार -
एकूण६००४ कोटी ३९ लाख३५ लाख २० हजार