शहरं
Join us  
Trending Stories
1
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
2
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
5
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
6
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
7
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
8
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
9
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
10
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
11
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
12
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
13
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
14
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
15
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
16
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
17
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
18
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
19
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
20
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार

पुण्यातील वनराज आंदेकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट; आणखी एका आरोपीला पोलिसांकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 10:29 IST

पोलिसांनी याआधी काही जणांना अटक केल्यानंतर काल आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Vanraj Andekar Murder ( Marathi News ) : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी याआधी काही जणांना अटक केल्यानंतर काल आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. संगम संपत वाघमारे असं काल अटक करण्यात आलेल्या २० वर्षीय आरोपीचं नाव असून त्यानेच आंदेकर यांच्या हत्येसाठी शस्त्रे पुरवल्याची माहिती आहे. 

वनराज आंदेकर यांच्या हत्येप्रकरणी यापूर्वीच १५ हून अधिक आरोपींना अटक करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात संगम वाघमारे याने आरोपींना शस्त्रे पुरवल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानंतर आता संगम वाघमारे या अल्पवयीन आरोपीलाही पोलिसांकडून अटक करण्यात आली. संगमला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

नेमका कशामुळे झाला खून?

वनराज आंदेकर यांचा खून कौटुंबिक, संपत्ती, तसेच वर्चस्वाच्या वादातून झाल्याचा संशय आहे. त्या दृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे. आंदेकर यांचा रविवारी रात्री (दि. १) नाना पेठेतील डोके तालीम परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडून, तसेच कोयत्याने वार करून खून करण्यात आला. प्राथमिक तपासात बहीण संजीवनी, तिचा पती जयंत, दीर गणेश, प्रकाश यांच्याशी आंदेकर यांचे वाद झाले होते. कौटुंबिक वादातून खून झाल्याची माहिती मिळाली. आंदेकरांच्या सांगण्यावरून दुकानावर अतिक्रमण कारवाई झाल्याच्या रागातून कोमकर यांनी खुनाचा कट रचला आणि आंदेकर टोळीतून फुटलेल्या सोमनाथ गायकवाडची मदत घेतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

गायकवाडचा साथीदार निखिल आखाडे, त्याचा मित्र शुभम दहिभाते यांच्यावर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यांत नाना पेठेत हल्ला करण्यात आला होता. कोयता, स्कू-ड्रायव्हरने त्यांच्यावर वार करण्यात आले होते. हल्ल्यात आखाडे याचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला होता. आखाडेचा खुनाचा बदला घेण्याचा तयारीत सोमनाथ होता. संजीवनी, प्रकाश, गणेश, जयंत यांच्याशी संगनमत करून सोमनाथने आंदेकरांच्या खुनाचा कट रचल्याची माहिती तपासात मिळाली आहे. या प्रकरणी पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कसा झाला हल्ला?

नाना पेठेतील आंदेकर चौकात वनराज आंदेकर चुलत भावासोबत थांबले होते. रात्री साडेनऊची वेळ होती. बेसावध आंदेकर गप्पा मारत असताना काही समजण्याच्या आतच सहा दुचाकींनी त्यांना गराडा घातला. या दुचाकीवरून आलेल्या १३ जणांनी आंदेकर यांना घेरलं. सुरुवातीला त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात वनराज आंदेकर यांचा जागीच मृत्यू झाला. हा सर्व थरार जवळच असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. नाना पेठेसारखा गजबजलेल्या भागात रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. एरवी मित्रांच्या गराड्यात असणारे वनराज आंदेकर रविवारी मात्र चुलत भावासोबत थांबले होते. जवळच त्यांचं घर होतं आणि घरापासून चालत चालत ते मुख्य रस्त्यालगत असणाऱ्या चौकात आले होते. हल्लेखोर त्यांची वाट पाहत दबा धरूनच बसले होते. मोकळ्या जागेत वनराज आंदेकर येताच ६ दुचाकी त्यांच्या दिशेने आल्या आणि त्यांच्यावर हल्ला केला. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी