शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत काँग्रेसला मोठा धक्का; विधानपरिषदेसाठी डावलल्याने सचिन साठे यांचा तडकाफडकी राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2020 19:41 IST

पुण्यातील काँग्रेसची ताकद वाढावी यासाठी आमदारकीची संधी मिळावी एवढीच अपेक्षा होती.

पिंपरी : गेल्या पंधरा वर्षांत शहरातील काँग्रेसला न्याय मिळालेला नाही. विधानपरिषद निवडणूकीत डावलल्याने पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी  राजीनामा दिला आहे. मात्र, ‘‘वैयक्तिक कारणास्तव जबाबदारीतून मुक्त होत आहे, असे साठे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राज्यात भाजपाचे सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना,राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीने सरकार स्थापन केले. राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेसाठी नावे द्यायची होती. त्यात काँग्रेसच्या वतीने शहराला संघटन वाढविण्यासाठी आमदारकीची संधी मिळावी, काँग्रेसची इच्छा होती. मात्र, आमदारांमध्ये शहरातील काँग्रेसच्या सदस्यांचा समावेश नाही. त्यामुळे शहराध्यक्ष साठे यांनी राजीनामा दिला आहे.

..............................................................अन्याय झाल्याने नाराजीसाठे मागील सहा वर्षांपासून शहर काँग्रेसचे नेतृत्व करत होते. पडत्या काळात त्यांच्याकडे पक्षाची धुरा आली होती. त्यांनी विविध आंदोलने करुन शहरात पक्ष जिवंत ठेवला.  राज्यात काँग्रेस आघाडीची सत्ता आल्यानंतर न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, डाववल्याने राजीनामा दिला आहे....................................पत्रकार परिषदेस माजी महापौर कविचंद भाट, काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा श्यामला सोनवणे, महिला अध्यक्ष गिरीजा कुदळे, सेवा दलाचे संग्राम तायडे, विष्णपंत नेवाळे, श्याम आगरवाल, राजाभाऊ गोलांडे आदी उपस्थित होते................................................गेल्या २४ वर्षांपासून पक्षाचे काम करत आहे. विद्यार्थी, युवक संघटनेपासून काम करत आहे. सहा वर्षांपासून शहराध्यक्ष म्हणून काम करत होतो. तन,मन धनाने पक्षाचे काम केले.  वैयक्तिक कारणास्तव या जबाबदारीतून मुक्त होत आहे. यापुढे देखील पक्षाचे काम निष्ठेने करणार आहे. मी विधानपरिषदेची उमेदवारी निश्चितपणे मागितली होती. पण संधी नाही मिळाली.-सचिन साठे, शहराध्यक्ष काँग्रेस

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcongressकाँग्रेसResignationराजीनामाElectionनिवडणूकMLAआमदार