शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राजगुरूनगर सहकारी बँकेत मोठा घोटाळा, रोखपालाचा ८१ लाखांचा अपहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 22:27 IST

राजगुरूनगर सहकारी बँकेच्या महाळुंगे इंगळे शाखेत रोखपालाने ८१ लाख ३४ हजार इतक्या बँकेच्या व खातेदारांच्या पैशांचा अपहार केला आहे

चाकण : राजगुरूनगर सहकारी बँकेच्या महाळुंगे इंगळे शाखेत रोखपालाने ८१ लाख ३४ हजार इतक्या बँकेच्या व खातेदारांच्या पैशांचा अपहार केला आहे. याबाबत चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनेक महिन्यांपासून सुरू असलेला अपहार उशिरा लक्षात आल्याने बँकेचे धाबे दणाणले असून, सभासदांमध्ये ठेवींबाबत घबराट निर्माण झाली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार १५ जून २०१६ ते ५ जानेवारी २०१७ दरम्यान घडला. याप्रकरणी राजगुरूनगर सहकारी बँकेच्या महाळुंगे शाखेतील रोखपाल राहुल विलासचंद्र बोरा याच्यावर अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील काळात रोखपाल ( कॅशिअर ) राहुल बोरा याने महाळुंगे शाखेत नोकरी करताना दैनंदिन कामकाजात ग्राहक सेवेसाठी दैनंदिन कामकाजासाठी स्ट्रॉंग रूममधून पैसे काढणे, एटीएममध्ये पैसे भरणे, त्याचा तपशील ठेवणे व दिवस अखेरीस शिल्लक रक्कम स्ट्रॉंग रूममध्ये जमा करणे अशा प्रकारचे काम करताना ८१ लाख ४१ हजार ९४३ रुपये ९६ पैसे इतक्या मोठ्या रकमेचा अपहार केला.एटीएममध्ये पैसे भरल्यानंतर ४३ लाख ९५ हजार २०० इतकी रक्कम शिल्लक असणे आवश्यक असताना मोजणीनंतर ती रक्कम १ लाख ५९ हजार २०० रुपये इतकी आढळून आली. तसेच बँकेच्या कॅश कस्टडीमध्ये नाणेवारी प्रिंटनुसार ५१ लाख २१ हजार १०३ रुपये ९६ पैसे इतकी रक्कम भरणे आवश्यक होते. परंतु प्रत्यक्षात मोजणी करताना ही रक्कम १२ लाख १५ हजार १६० रुपये इतकी मिळून आली. या रोख रकमेचा बँकेची व जनतेच्या पैशाचा अपहार करून फसवणूक केली आहे. बँकेचे अधिकारी किशोर ज्ञानेश्वर आदक वय ५७, रा. राजगुरूनगर, जि. पुणे यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

टॅग्स :Puneपुणे