शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांसाठी मोठी बातमी: शहरातील सर्व दुकाने आता ९ वाजेपर्यंत खुली राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 19:47 IST

शुक्रवारी मध्यरात्रीपासून आदेश लागू होणार..

ठळक मुद्दे

पुणे : पुणे शहरातील सर्व दुकानांना आता रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास पुणे महापालिकेने परवानगी दिली आहे. हे आदेश आजपासून लागू करण्यात आले आहेत.        महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश शुक्रवारी जारी केले. हॉटेल, बार, रेस्टॉरंट यांना ५ ऑक्टोबर पासून रात्री १० वाजेपर्यंत राज्य शासनाने परवानगी दिली होती. मात्र अत्यावश्यक सेवांची म्हणजेच मेडिकल, दवाखाने आदी सेवा वगळता इतर व्यवसायास सायंकाळी ७ वाजेपर्यंतची मर्यादा कायम ठेवण्यात आली होती. यामुळे येऊ घातलेल्या सणासुदीच्या काळात शहरातील सर्व दुकानांना रात्री ९ पर्यंत परवानगी मिळावी, यासाठी व्यापारी वर्गासह सर्वच राजकीय पक्षांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व महापालिका आयुक्त यांच्याकडे सातत्याने मागणी केली होती.       या मागणीस आज अखेर यश आले असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेऊन दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे.     यामुळे आता महापालिका क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील अन्य अत्यावश्यक वस्तूंची दुकाने, सेवा (औषधी विक्री दुकाने, दवाखाने वगळून), अत्यावश्यक सेवा दुकानांव्यतिरिक्त इतर वस्तूंची दुकाने पूर्ण वेळ खुली राहणार आहेत. यात शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स हे देखील रात्री ९ पर्यंत खुली राहणार आहेत. मात्र, त्यामधील सिनेमागृह पुढील आदेश येईपर्यंत बंदच राहणार आहेत.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याcommissionerआयुक्त