महुडे : भोर तालुक्याच्या पश्चिमेस हिर्डोशी खोरे या खोऱ्यात जाण्याचा मार्ग म्हणजे भोर-महाड रस्ता. या रस्त्यावर नांदगावजवळील पुलाला मोठा खड्डा पडला आहे. या रस्त्यावर वाहतुकीचे प्रमाण जास्त असते. रात्रीच्या वेळेस किंवा गाडीला बाजू देताना अपघात होऊ शकतो.हिर्डोशी खोऱ्यात जाणारा एकमेव मार्ग म्हणजे भोर-महाड रस्ता आहे. या रस्त्यावरून कोकणात जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. स्थानिक शेतकरी यांची बैलाची व जनावरांची वर्दळ असते. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही दिवसांपूर्वी बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याचे काम केले की मलमपट्टी करण्याचे काम केले, याची नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. नांदगाव येथील पुलावर अपघात झाल्यावर खड्डा बुजवला जाणार का, असे स्थानिक नागरिक म्हणत आहेत. जनतेचे सेवक म्हणणारे राजकीय नेते व सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पाहावयास मिळत आहे. पुलाचा खड्डा लवकरात लवकर भरून घ्यावा, अशी मागणी होत आहे.
भोर तालुक्यातील नांदगावजवळील पुलाला मोठा खड्डा; अपघाताचा वाढला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 17:53 IST
भोर तालुक्याच्या पश्चिमेस हिर्डोशी खोरे या खोऱ्यात जाण्याचा मार्ग म्हणजे भोर-महाड रस्ता. या रस्त्यावर नांदगावजवळील पुलाला मोठा खड्डा पडला आहे.
भोर तालुक्यातील नांदगावजवळील पुलाला मोठा खड्डा; अपघाताचा वाढला धोका
ठळक मुद्देरात्रीच्या वेळेस किंवा गाडीला बाजू देताना होऊ शकतो अपघातपुलाचा खड्डा लवकरात लवकर भरून घ्यावा, नागरिकांची मागणी