शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

MPSC चा मोठा निर्णय! गुणवत्ता यादी, पसंती क्रम आणि 'Opting Out' च्या विकल्पाची अंमलबजावणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 15:25 IST

आयोगाचा हा सर्वाधिक महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे

पुणे: आज एमपीएससीने (MPSC) महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०१९ परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केली. पहिल्यांदाच आयोगाने सर्वसाधारण गुणवत्ता यादी लावून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम अथवा भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प उपलब्ध करून दिला आहे. यापूर्वी गुणवत्ता यादी, पसंती क्रम आणि भरती प्रकियेतून बाहेर पडण्याची सुविधा हे तीन महत्वपूर्ण निर्णय आयोगाने घेतले होते, त्याची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे.

आयोगाचा हा सर्वाधिक महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. यामुळे आयोगाच्या परीक्षा पद्धतीत आणखी पारदर्शकता येऊन होतकरू मुलांना संधी मिळतील. यामुळे आता एमपीएससी जाहीरातीत जेवढ्या जागा काढते त्या सर्व जागा भरल्या जातील. एका जागेवर एकच विद्यार्थी निवडला जाईल. यापूर्वीच्या परीक्षा पद्धतीमुळे बऱ्याच जागा शिल्लक राहत होत्या. आयोगाच्या या निर्णयाचे विद्यार्थ्यांकडूनही स्वागत होत आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. यामुळे जाहीरातीतील सर्व जागा भरल्या जातील. राज्यातील होतकरू विद्यार्थ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होईल. एमपीएससीने घेतलेला हा निर्णय भारतात कोणत्याही इतर आयोगाकडून घेतला गेला नाही. 

-सुनिल अवताडे (सहसचिव, एमपीएससी)

टॅग्स :Puneपुणेexamपरीक्षाMPSC examएमपीएससी परीक्षा