नायफड येथील मोठा बंधारा फुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:08 IST2021-07-23T04:08:56+5:302021-07-23T04:08:56+5:30
नायफड येथे नुकताच आर्ट ऑफ लिविंग या संस्थेने वाघदरा या शिवारात बंधारा बांधला होता. बुधवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे बंधारा पूर्ण ...

नायफड येथील मोठा बंधारा फुटला
नायफड येथे नुकताच आर्ट ऑफ लिविंग या संस्थेने वाघदरा या शिवारात बंधारा बांधला होता. बुधवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे बंधारा पूर्ण भरून ओसंडून वाहू लागला. पाण्याचा दबाव वाढल्याने बुधवारी (दि २१) रात्री बंधाऱ्याला भगदाड पडले. रात्रीची वेळ असल्याने जीवित हाणी झाली नाही. परंतु, परिसरातील २५ ते ३० शेतकऱ्यांची शेती पुर्ण वाहून गेली आहे. यात भात पिकाचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची जमीन पूर्ण वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाकडून त्वरित पंचनामे करून भरपाईची मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित बांधणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.
नायफड येथील हे धरण आर्ट ऑफ लिविंग या स्वयंसेवी संस्थेने बांधले असून हे धरण मुळातच वळणावर धरण बांधले आहे. या पाचशे मीटर लांबी असलेल्या माती धरणाचे काम अवघ्या पाच ते सहा महिन्यात पूर्ण करण्यात आले. या धरणाचे सांडवे चुकीच्या बाजूने उंचावर असल्याने पाणी वाहून गेले नाही. त्यामुळे धरण मधोमध फुटले.
धरण फुटल्यानंतर नायफड प्रमाणेच उतारावर डेहणे येथील ओढ्याच्या परिसरातील ओळीने शेतक-यांच्या शेतीचे बांध फुटले असुन जमीन वाहुन गेल्याने पिकांचे नुकसान झालेच परंतु शेत जमीन (बांधणी) दुरूस्त करणे शक्य नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. या अचानक आलेल्या पुरामळे पुलांचे भराव वाहुन गेले आहेत. डेहणे येथील दोन्ही पुलांचे मोठे नुकसान झाले आहे. तर नायफड गावातील लघु बंधारा अचानक आलेल्या पुरामळे वाहुन गेला आहे.
कोट
हे धरण बांधण्यात झालेल्या निष्काळजीपणा मुळे ही वेळ आली आहे. वळणाची जागा, पुर्ण मातीचा, निकृष्ठ दगडी पिचींग, व पाण्याचा दाब न पहाता काढलेला सांडवा यामुळे हे धरण फुटले. आमचे तीस शेतकरी जमीन गेल्याने रस्त्यावर आले आहेत. या शेतीवर अवलंबून असल्याने आमचा संसार संपला आहे. आम्हाला पैसे नकोत. होती तशी शेती त्वरित दुरुस्त करून मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
---------------
पश्चिम भागात पडत असलेल्या संततधार पावसामुळे हे धरण पुर्ण भरले गेले. रात्री दहाच्या सुमारास सांडव्यावरून पाणी पुर्ण क्षमतेने न गेल्यामुळे धरण मधोमध फुटले असावे. बंधारा फुटल्याने शेकडो एकर शेती वाहुन गेली. भातशेती जमीनदोस्त झाली आहे तहसीलदारांच्या सुचनेनुसार उद्या पासून पंचनामे करण्यात येतील.
- एस. डी. गोडे, मंडलाधिकारी वाडा
फोटो:-
1)नायफड:- येथील आर्ट ऑफ लिविंग या स्वयंसेवी संस्थेने बांधले लघुधरण मधोमध फुटले, शेकडो एकर शेती वाहुन गेली.
2)धरण फुटल्या ने परिसरातील तिस शेतक-यांच्या बांध फुटले.
3)धरण फुटले आणी पाण्याच्या लोंढ्याने शेती च वाहुन गेली.