शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; जिल्हाप्रमुखाचा शिंदेच्या शिवसेनेच्या प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 13:18 IST

ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून हकालपट्टी

पुणे: देशात पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. तर राज्यात लवकरच महापालिकेच्या निवडणुका होतील. राज्यात राजकीय क्षेत्रातून राजीनामा  आणि हकालपट्टीचे सुरु झाले आहे. अशातच पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 

 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले होते. त्यामध्ये बाळासाहेब चांदेरे यांना पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे ठाकरे गटातून उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ठाकरे गटातुन हकालपट्टी करण्यात आल्याचे सांगितले होते. त्यानंतर लगेचच ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. आज सायंकाळी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चांदेरे यांच्यासह अनेकजण शिंदे गटात करणार प्रवेश आहेत.  

भोर वेल्हा मुळशी या भागतील अनेक शिवसैनिक ठाकरेंची साथ सोडणार आहेत. पुणे जिल्ह्यात चांदेरे भोर विधानसभा लढण्यासाठी ईच्छुक आहेत. मात्र महा विकास आघाडीत भोर मतदार संघ काँग्रेसकडे असल्याने चांदेरे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत करणार प्रवेश आहेत. याआधी सुरुवातीला रमेश कोंडे यांनी ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे गटात प्रवेश आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून बाळासाहेब चांदेरे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. 

तीन तालुक्यात फायदा

चांदेरे यांनी पुरंदर, हवेली आणि भोर या तीन तालुक्यात ठाकरे गटाचं मोठं काम केलं आहे. या तीन तालुक्यात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. त्यामुळे शिंदे गटाला या तीन तालुक्यात मताधिक्य वाढवण्यास मदत होणार आहे. चांदेरे यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाला पुणे जिल्ह्यात फायदा होणार असून ठाकरे गटासाठी मात्र हा मोठा धक्का बसला असल्याची चर्चा सुरु आहे. 

टॅग्स :PuneपुणेEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारणShiv Senaशिवसेना