संरक्षक कठड्यामुळे मोठी दुर्घटना टळली
By Admin | Updated: December 20, 2014 00:05 IST2014-12-20T00:05:23+5:302014-12-20T00:05:23+5:30
पुणे-नगर हायवेवर रांजणगाव गणपती (शिरूर) येथील महागणपती मंदिराजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने एसटीबस संरक्षक कठड्यामुळे अडकली;

संरक्षक कठड्यामुळे मोठी दुर्घटना टळली
रांजणगाव गणपती : पुणे-नगर हायवेवर रांजणगाव गणपती (शिरूर) येथील महागणपती मंदिराजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने एसटीबस संरक्षक कठड्यामुळे अडकली; अन्यथा ओढ्यात कोसळून मोठी दुर्घटना घडली असती. यात १० प्रवासी जखमी झाले.
शुक्रवारी सकाळी हा अपघात झाला. अपघाताची खबर चालक रघुनाथ काशिनाथ इंगळे (बुलढाणा) यांनी पोलिसांना दिली.
मलकापूर ते पुणे ही बस पुण्याकडे जात असताना, हा अपघात झाला. रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जाऊन पुलावर असणाऱ्या संरक्षक कठड्यामुळे बस टांगती राहिली. यामुळे मोठी दुर्घटना टळली. जखमीची नावे रात्री उशिरापर्यंत समजली नाहीत.
येथे असलेल्या तीव्र उतारामुळे वारंवार अपघात होतात. मंदिराजवळ दोन्ही बाजूने गतिरोधक बसवावेत, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. (वार्ताहर)