पैशाच्या पावसाचे आमिष दाखविणाऱ्या भोदूंना अटक
By Admin | Updated: January 24, 2017 02:52 IST2017-01-24T02:52:37+5:302017-01-24T02:52:37+5:30
पैशाचा पाऊस पडतो असे नागरिकांना सांगून पैशाचा पाऊस पडण्याच्या बहाण्याने चार लाख २९ हजार रुपयांची लुटणाऱ्या

पैशाच्या पावसाचे आमिष दाखविणाऱ्या भोदूंना अटक
शिक्रापूर : पैशाचा पाऊस पडतो असे नागरिकांना सांगून पैशाचा पाऊस पडण्याच्या बहाण्याने चार लाख २९ हजार रुपयांची लुटणाऱ्या तीन भोंदू बाबांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना आज शिरूर न्यायालयात हजर केले असता तिघांना २६ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
अमोल शशिकांत वाबळे यांनी फिर्याद दिली आहे. पोलीसांनी सागरनाथ मिठानाथ परमार (वय -६५) चंदुनाथा सागरनाथ परमार वय (२३), पटेलनाथ सम्जुनाथ चौहान ( वय ६७ रा. सतलासा ता. सतलासा जी. म्हैसाणा राज्य गुजरात सध्या सासवड ) यांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली.
वाबळे हे शिक्रापूर येथे काम करत असताना तेथे भगवे कपडे घातलेले दोन भोंदू आले. धंद्यात काही अडचणी असतील तर आमचे आळंदी येथील गुरुमहाराज दूर करतात असे सांगितले. त्यांना स्मशानभूमीत नेले तेव्हा स्मशानभूमीत एका महाराजाने काही वस्तूंची पूजा मांडलेली होती तेथे गेल्यानंतर त्या भोंदूबाबांनी एका मडक्यात एक रुपया टाकून त्याला लालकापडाने बांधले. मडक्यातून पन्नास रुपयांच्या दीडशे ते दोनशे नोटा बाहेर काढल्या. आम्हाला पैशाचा पाऊस पडता येतो असे सांगत तुम्हाला काही खर्च करावा लागेल असे सांगितले. धूप आणण्यासाठी एक लाख रुपये मागितले संगमनेर येथील बँकेचे खाते नंबर देऊन त्यामध्ये पैसे टाकण्यास सांगितले विधीमध्ये अडथला येत आहे असे सांगून अमोल वाबळे याचेकडून ऐकून चार लाख लाटले.