शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भोसरीतील तरुणांना बुधवार पेठेत लूटले; २ महिलांना विश्रामबाग पोलिसांकडून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 16:45 IST

व्यवसायानिमित्ताने बुधवार पेठ परिसरात आलेल्या दोन तरुणांना लुटल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी २ महिलांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देरविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास बुधवार पेठेतील भोई गल्ली येथील प्रकारविश्रामबाग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत दोन्ही महिलांना घेतले ताब्यात

पुणे : व्यवसायानिमित्ताने बुधवार पेठ परिसरात आलेल्या दोन तरुणांना लुटल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी २ महिलांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही तरुण भोसरी परिसरातील आहेत.पूनम श्रीनिवास कांबळे (वय ३०, रा. भोई, गल्ली, बुधवार पेठ) व गीता चंद्र्र नाईक (वय ३०) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. याप्रकरणी शिवाजी वाघमोडे (वय २८, रा. भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी वाघमोडे हे व्यावसायिक आहेत. त्यांना इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी करायची होती. त्यामुळे ते त्यांचे मित्र सागर लाटे यांच्याबरोबर रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास बुधवार पेठेतील भोई गल्ली येथून पायी निघाले होते. त्यावेळी संबंधित महिलांनी त्या दोघांच्या हाताला धरून ओढत एका खोलीत नेले. खोलीचे दार बंद करून वाघमोडे यांच्या खिशातील सहा हजार ४०० आणि मित्र सागर यांच्या खिशातील तीन हजाराची रोकड काढून घेतली. त्यानंतर त्यांना खोलीतून बाहेर काढले.तरुणांनी तत्काळ विश्रामबाग पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत दोन्ही महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास महिला सहायक निरीक्षक वर्षा शिंदे या करत आहेत.

टॅग्स :ArrestअटकPuneपुणे