शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भोसरी पोलिसांची मोठी कारवाई; कुख्यात गुन्हेगारांकडून २४ पिस्तूल, ३८ काडतुसे जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 17:09 IST

टोळीचा पर्दाफाश; आरोपींनी पिंपरी-चिंचवड व पुणे जिल्ह्यात विक्रीसाठी पिस्तूल पुरवठा केल्याचे तपासात निष्पन्न

पिंपरी : मध्यप्रदेशातून पिस्तूल आणून शहरात त्याची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. यात १२ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून २४ पिस्तूल व ३८ जिवंत काडतुसे जप्त केली. भोसरीपोलिसांच्या तपास पथकाने ही कारवाई केली.

बबलूसिंग उर्फ राॅनी अत्तरसिंग बरनाला (रा. उमर्टी, पो. बलवाडी, ता. वरला, जि. बडवाणी, मध्यप्रदेश) कालू उर्फ सुशील मांगीलाल पावरा (रा. अंमलवाडी, ता. चोपडा, जि. जळगाव, मूळ रा. बडवाणी, मध्यप्रदेश), रुपेश उर्फ संतोष सुरेश पाटील (रा. भोसरी, मूळ रा. धुळे) उमेश अरून रायरीकर (रा. गायकवाड वाडी, बहुली, ता. हवेली), बंटी उर्फ अक्षय राजू शेळके (रा. मुंढवा, पुणे), धिरज अनिल ढिगारे (रा. हडपसर, पुणे), दत्ता उर्फ महाराज सोनबा मरगळे (रा. पेरणे फाटा, मूळ रा. चीलोबा वस्ती, मलठण, ता. दौंड), माॅन्टी संजय बोथ उर्फ माॅन्टी वाल्मीकी (रा. नेहरू नगर, पिंपरी), अमित बाळासाहेब दगडे (रा. बावधन), राहूल गुलाब वाल्हेकर (रा. भोर), संदीप आनंता भुंडे (रा. बावधन), असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी पोलिसांच्या तपास पथकाला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी आरोपी रुपेश पाटील याला अटक केली. त्याच्याकडून चार पिस्तूल व चार काडतुसे जप्त केली. आरोपीने ते पिस्तूल मध्यप्रदेशातून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांचे पथक मध्यप्रदेशात रवाना झाले. तेथील बडवाणी जिल्ह्यातील वरला तालुक्यातील बलवाडी, उमर्टी गावाजवळ जंगलात सापळा रचून पाठलाग करून पिस्तुलाचा मुख्य डिलर आरोपी रॉनी बरनाला याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून आठ पिस्तूल व २० जिवंत काडतुसे जप्त केली. त्यानंतर रॉनीचा मध्यप्रदेशातील साथीदार कालू पावरा याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन पिस्तूल व पाच काडतुसे जप्त केली. आरोपींनी पिंपरी-चिंचवड व पुणे जिल्ह्यात विक्रीसाठी पिस्तूल पुरवठा केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी इतर आरोपींनाही अटक केली.

भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शंकर आवताडे, निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, सहायक निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, पोलीस कर्मचारी गणेश हिंगे, समीर रासकर, गणेश सावंत, सुमीत देवकर, विनोद वीर, संतोष महाडीक, आशिष गोपी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

सोशल मीडियाचा वापर; शस्त्रांचा मध्यप्रदेशातून पुरवठाआरोपी शस्त्रांचा मध्यप्रदेशातून पुरवठा करीत असत. त्यासाठी आरोपी राॅनी व कालू हे सोशल मीडियाव्दारे आरोपींना त्यांचा संपर्क क्रमांक देत असत. तसेच अनेक सराईत गुन्हेगार येरवडा जेलमध्ये असताना आरोपी राॅनी व कालू यांचा संपर्क क्रमांक एकमेकांना देत असत. ‘मुळशी पॅटर्न’नुसार गुन्हे करणारा आरोपी नन्या रायरीकर तसेच राहुल वाल्हेकर, अमित दगडे, धिरज ढिगारे, बंटी शेळके यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडून २४ पिस्तूल व ३८ जिवंत काडतुसे असा एकूण ११ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी राॅनी व कालू यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडbhosariभोसरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक