शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

Bhosari Maharashtra Assembly Election 2024 Result: भोसरीच्या मतमोजणीत नऊ हजार मते जास्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 17:36 IST

पिंपरी : भोसरीच्या मतमोजणीत प्रत्यक्ष केंद्रावर झालेले मतदान आणि मोजणीमध्ये मतांची तफावत आढळली आहे. मतदानाच्या दिवशी निवडणूक विभागाने दिलेल्या ...

पिंपरी :भोसरीच्या मतमोजणीत प्रत्यक्ष केंद्रावर झालेले मतदान आणि मोजणीमध्ये मतांची तफावत आढळली आहे. मतदानाच्या दिवशी निवडणूक विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार ३ लाख ६५ हजार ५५ मतदान झाले होते. मात्र, प्रत्यक्ष मतमोजणीत ३ लाख ७४ हजार ५४७ मतांची मोजणी करण्यात आली आहे. तब्बल ९४९२ मते जास्त असल्याचे समोर आले आहे.भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या निकालाची अंतिम आकडेवारी शनिवारी रात्री उशिरा प्रसिद्ध झाली. त्यामध्ये विजयी उमेदवार महेश लांडगे यांना २ लाख १३ हजार ६२४, तर पराभूत अजित गव्हाणे यांना १ लाख ४९ हजार ८५९ मते मिळाली. बलराज कटके यांना १९०९, अमजद खान ३११७, जावेद शहा २३२, अरुण पवार १४७, खुबुद्दीन होबळे १११, गोविंद चुनचुने २९०४, हरिश डोळस १७३, रफिक कुरेशी ३०१ आणि शलाका कोंडावर यांना ३०१ मते मिळाली. ही एकूण आकडेवारी ३ लाख ७२ हजार ७१९ होत आहे.‘नोटा’ म्हणजेच वरीलपैकी एकही योग्य उमेदवार नसल्याचे मत २६८५ मतदारांनी नोंदवले. ५४ मते अवैध ठरली. ही सगळी संख्या ३ लाख ७४ हजार ५७४ होते. मात्र, मतदानाच्या दिवशी जाहीर केलेली आकडेवारी अंदाजित असून दुसऱ्या दिवशी सुधारित आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये ३ लाख ७४ हजार ४४२ मतदान झाल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार मतमोजणीची आकडेवारी बरोबर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.बुधवारी मतदान झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत माहिती येत होती. तेव्हा जाहीर केलेली टक्केवारी अंदाजित होती. अंतिम आकडेवारी गुरुवारी जाहीर करण्यात आली. ती आणि पोस्टल मतदानाची बेरीज करण्यात आली. त्यानुसार एकाही मताचा फरक नाही.- रेवणनाथ लबडे, निवडणूक निर्णय अधिकारी, भोसरी.

टॅग्स :PuneपुणेElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVotingमतदानbhosari-acभोसरी