भोर कचरा डेपो हिरवाईने नटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:07 IST2021-01-01T04:07:33+5:302021-01-01T04:07:33+5:30

-- भोर : नगरपालिकेच्या भोरदरा येथील कचरा डेपो परिसरात "माझी वसुंधरा" या योजने आंतर्गत भोर नगरपालिकेचे गट नेते ...

Bhor waste depot will be green | भोर कचरा डेपो हिरवाईने नटणार

भोर कचरा डेपो हिरवाईने नटणार

--

भोर : नगरपालिकेच्या भोरदरा येथील कचरा डेपो परिसरात "माझी वसुंधरा" या योजने आंतर्गत भोर नगरपालिकेचे गट नेते तथा माजी नगराध्यक्ष सचिन हर्णसकर व मुख्याधिकारी डॉ. विजय कुमार थोरात यांचे हस्ते २५० वृक्षांचे वृक्षा रोपण करण्यात आले. यामुळे कचरा डेपो हिरवाईने नटेल अशी अपेक्षा माजी नगराध्यक्ष तृप्ती किरवे यांनी केली.

माझी वसुंधरा योजने आंतर्गत भोर नगर पालिकेला २५०० वृक्षांचे वृक्षा रोपण करण्याचे उद्धिष्ठ देण्यत आले असून बुधवारी या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुमंत शेटे, गणेश पवार, नगरसेवक चंद्रकांत मळेकर,अमित सागळे, पद्मिनी तारु, सोनम मोहिते, रुपाली कांबळे, वृषाली घोरपडे, स्नेहल पवार, आशा रोमण, आशा शिंदे यांचे सह भोर नगर पालिकेचे अधिकारी अभिजीत सोनावले, दिलीप भारंबे, महेंद्र बांदल, लालासो गायकवाड, ज्ञानेश्वर मोहिते, स्वाती होले, व कार्यालयीन कर्मचारी, सफाई कामगार उपस्थित होते.

यावेळी गुलमोहर, बहावा, कांचन आदी भारतीय प्रजातींच्या वृक्षांचे वृक्षा रोपण करण्यात आले. कार्यक्रमात हरित भोर करण्याची उपस्थितांना शपथ देण्यात आली

--

चौकट - भोर नगर पालिकाने माझी वसुंधरा योजने आंतर्गत लावलेल्या वृक्षांचे जतन करण्यासाठी प्रभागाचे नगर सेवक व नगरपालीकेचा एक कर्मचारी यांचेवर जबाबदारी सोपवलेली असल्याचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांनी सांगीतले.

--

Web Title: Bhor waste depot will be green

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.