शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

भोरला राजकीय आखाडा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 02:47 IST

नगरपालिकेचा पंचवार्र्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, निवडणुकीची आचारसंहिता आजपासून लागू करण्यात आली आहे. ख-या अर्थाने निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात होईल.

भोर : नगरपालिकेचा पंचवार्र्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, निवडणुकीची आचारसंहिता आजपासून लागू करण्यात आली आहे. ख-या अर्थाने निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात होईल.भोर नगरपालिकेची प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत यापूर्वीच जाहीर झाली आहे. आज नगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत निवडणुकीची आचारसंहिता राहणार आहे. शहराची लोकसंख्या २० हजाराच्या आसपास असून, २ वॉर्डचे ७, तर ३ वॉर्डचा एक, असे एकूण ८ प्रभाग आहेत. नव्यानेच प्रभाग करण्यात आल्याने अनेक वॉर्ड विखुरले गेले आहेत. यामुळे अनेकांची निवडणुकीत दमछाक होणार आहे. यात शहरातील चार ते पाच झोपडपट्ट्यांचा समावेश आहे. एकूण १५ हजार २०० मतदार आहेत. नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून, नगरपालिकेत ९ जागा महिलांसाठी राखीव असल्याने नगराध्यक्षासह एकूण १० महिला राहणार असून, पालिकेवर महिलाराज असणार आहे.निवडणुकीचे मतदान १५ जुलै सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत, मतमोजणी १६ जुलै सकाळी १० वाजल्यापासून होणार असल्याचे मुख्याधिकारी संतोष वारुळे यांनी सांगितले.

चौरंगी लढतीची शक्यताया वेळी प्रथमच थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने सर्वच पक्षांतील इच्छुकांची संख्या वाढली आहे. सत्ताधारी काँग्रेसकडे सर्वाधिक इच्छुक आहेत. उमेदवारी जाहीर होण्याआधी काहींनी प्रचारही सुरू केला आहे. शहरात सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा व शिवसेना अशी चौरंगी लढत होणार असून, काँग्रेस सत्ता टिकविण्यासाठी, तर राष्ट्रवादी व भाजपा सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. १९५५ ते १९६७या कालावधीत लाल निशाण पक्षाचे दिवंगत आमदार जयसिंग माळी यांच्या विचारांचा आणि कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव भोर शहरावर १० ते १५ वर्षे राहिला. १९७० मध्ये काँगेसची सत्ता आली.१९७४ ते १९९० पर्यंत दिवंगत अमृतलाल रावळ यांच्या गटाकडे भोर शहराची सत्ता होती.- १९९० नंतर अनंतराव थोपटे यांनी नगरपालिकेची सत्ता मिळवली. २००८चा अडीच वर्षांचा कार्यकाळ पालिकेची सत्ता राष्ट्रवादीकडे गेली. मात्र, त्यांच्यातील अंतर्गत वादामुळे पुन्हा सत्ता काँग्रेसकडे आली होती. 

टॅग्स :ElectionनिवडणूकPuneपुणे