शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

‘भीमाशंकर’कडून एफआरपीची रक्कम मिळणार

By admin | Updated: April 26, 2016 01:50 IST

उसाला एफआरपीप्रमाणे रक्कम बँकेत येत्या चार-पाच दिवसांत देणार असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

अवसरी : आंबेगाव तालुक्यातील दत्तात्रयनगर, पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०१५-१६मध्ये गाळप केलेल्या उसाला एफआरपीप्रमाणे रक्कम बँकेत येत्या चार-पाच दिवसांत देणार असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली. कारखान्याचे संस्थापक-अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या  सभेत देय एफआरपी लवकर देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. भीमांशकर सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०१५-१६मध्ये गाळप केलेल्या उसासाठी १,८०० रुपये प्रतिमेट्रिक टन याप्रमाणे अ‍ॅडव्हान्स देण्यात आलेला आहे. गळीत हंगाम २०१५-१६साठी २,२१५.३५ रुपये प्रतिमेट्रिक टन निव्वळ एफआरपी येत असून, त्यांपैकी कारखान्याने केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या निर्यात कोट्याप्रमाणे साखर निर्यात केलेली असल्याने ४५ रुपये प्रतिमेट्रिक टनाप्रमाणे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर केंद्र शासनाकडून अनुदान स्वरूपात परस्परवर्ग होणार आहे. एफआरपीच्या ८० टक्के १,८०० प्रतिमेट्रिक टन रक्क म वर्ग के लेली असल्याने संपूर्ण एफआरपी अदा करण्यासाठी ३७० रुपये प्रतिमेट्रिक टन देय राहतात. कारखान्याने दि. ३१ मार्च २०१६ पर्यंत गाळप के लेल्या ६,५२,९४० मेट्रिक टन उसासाठी १,८०० रुपये प्रतिमेट्रिक टन याप्रमाणे ११७ कोटी ५२ लाख ९३ हजार रुपये रक्कम ऊसउत्पादकांच्या खाती वर्ग केलेली आहे. तसेच, ३१ मार्च २०१६अखेर गाळप केलेल्या ६,५२,९४० मेट्रिक टन उसासाठी २०० रुपये प्रतिमेट्रिक टन याप्रमाणे १३ कोटी ५ लाख ८८ हजार रुपये ऊसउत्पादकांच्या खाती वर्ग केली जाणार आहे. १ एप्रिल २०१६पासून गाळप होणाऱ्या उसाला एकत्रित २,००० रुपये प्रतिमेट्रिक टन याप्रमाणे ऊसउत्पादक शेतकऱ्यांना रक्कम अदा केली जाणार असल्याची माहिती बेंडे यांनी दिली. (वार्ताहर)