शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

भीमाशंकर, सिंहगड विकास आराखड्याला उच्चाधिकार समितीची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 08:50 IST

- शिखर समितीच्या मान्यतेनंतर होणार निविदा प्रक्रिया, ऑक्टोबरनंतर कामाला सुरुवात

पुणे : दोन वर्षांनंतर नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यामधील भीमाशंकर येथील तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला राज्य सरकारच्या उच्चाधिकारी समितीने मान्यता दिली आहे. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या मान्यतेनंतर निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामाला ऑक्टोबरनंतर सुरुवात केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. भीमाशंकरसह सिंहगड किल्ल्याच्या विकास आराखड्यालाही मान्यता देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.  

नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकरसह अन्य तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येत असतात. त्या दृष्टीने या तीर्थक्षेत्राच्या परिसराचा समग्र विकास आराखडा तयार करून त्यात भाविकांसाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा, परिसरातील विविध देवस्थान, धार्मिक स्थळांची विकासकामे रस्त्याची कामे, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, इको टुरिझम याचा समावेश यात करुन २८८ कोटी १७ लाख रुपयांचा विकास आराखडा राज्य सरकारकडे सादर करण्यात आला होता.

११८ एकरचे भूसंपादन होणारराज्य सरकारची अंतिम मंजुरी मिळण्यापूर्वी हा आराखडा उच्चाधिकार समितीकडे सादर करण्यात येतो. त्यानुसार या समितीने मंगळवारी या आराखड्याला मंजुरी दिली. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, नियोजन, वित्त, सांस्कृतिक कार्य, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आणि पुरातत्त्व विभागाचे हे या उच्चाधिकार समितीच्या बैठकीला उपस्थित होते. यानंतर शिखर समितीच्या मान्यतेची गरज असून त्यानंतर विकासकामे करण्यासाठी निविदा काढल्या जाणार आहेत. भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी ११८ एकर जमिनीची गरज भासणार आहे. शिखर समितीच्या मान्यतेनंतर भूसंपादन करण्यात येईल.

आराखड्यात हे असेलया आराखड्यात २ हजार चारचाकी वाहने, २०० बसगाड्या, ५ हजार दुचाकींसाठी वाहनतळ तयार करण्यात येणार आहे. सध्याच्या बसथांब्याजवळील खासगी जागेत हे वाहनतळ उभारण्यात येणार आहे. वाहनतळ तसेच भाविकांसाठी प्रतीक्षालय, स्नानगृहे, शौचालये, लाॉकर सुविधा, दुकाने यासाठी १६३ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. तर बसस्थानकाचा पुनर्विकास मंदिर पुनर्बांधणी यासाठी ९० कोटी ४२ लाख तर भोरगिरी इको सेन्सिटिव्ह झोनमधील खासगी जागेचे भूसंपादन, राजगुरुनगर भीमाशंकर रस्ता, कोटेश्वर मंदिर जीर्णोद्धार, ट्रेकिंग व वॉकिंग ट्रेल यासाठी ३३ कोटी ८० रुपये देण्यात येतील. पावसाळ्यात या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस असतो. त्यामुळे ऑक्टोबरनंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. त्यादरम्यान निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर यांनी स्पष्ट केले.

सिंहगड किल्ल्यासाठी २८६ कोटी भीमाशंकरसह समग्र सिंहगड किल्ला विकास आराखड्यालाही मान्यता देण्यात आली. हा आराखडा एकूण २८५ कोटी ९९ लाख रुपयांचा असून यात किल्ला संरक्षण, संवर्धन, मूल्यसंवर्धन, परिसर संस्था संरक्षण, भूमीचित्र विकास, ट्रेक मार्ग सक्रिटचा विकास, पार्किंग व आपत्कालीन सेवांचा विकास, प्रकाश व्यवस्था, पाणीपुरवठाविषयक कामे, ऐतिहासिक व लोककला, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. याठिकाणी असलेले अतिक्रमण काढण्यात आले आहे. त्यामुळे येथील भूसंपादनाची गरज भासणार नाही, असेही इंदलकर यांनी स्पष्ट केले.

भीमाशंकर जोतिर्लिंग आणि सिंहगड किल्ल्याच्या विकास आराखड्याला उच्चाधिकार समितीने मान्यता दिली आहे. शिखर समितीच्या बैठकीत मान्यता मिळाल्यानंतर ऑक्टोबरनंतर प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्यात येईल. - जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड