भीमा नदीच्या पुलाची दुरवस्था

By Admin | Updated: November 2, 2015 00:50 IST2015-11-02T00:50:03+5:302015-11-02T00:50:03+5:30

इंदापूर व माढा या दोन तालुक्यातील दुवा असणारा गणेशवाडी येथील भीमा नदीवरील पूल संरक्षक कठडे तुटले आहेत; तसेच पुलावरील रस्ता खचल्याने धोकादायक बनला आहे.

Bhima river bridge | भीमा नदीच्या पुलाची दुरवस्था

भीमा नदीच्या पुलाची दुरवस्था

बावडा : इंदापूर व माढा या दोन तालुक्यातील दुवा असणारा गणेशवाडी येथील भीमा नदीवरील पूल संरक्षक कठडे तुटले आहेत; तसेच पुलावरील रस्ता खचल्याने धोकादायक बनला आहे. या पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी व्यक्त होत आहे.
माढा तालुक्यातून इंदापूर; तसेच माळशिरस तालुक्याशी संपर्क साधण्यासाठी कमी अंतराचा रस्ता असल्याने या पुलावरून सतत वाहतूक सुरू असते. त्याचप्रमाणे विद्यार्थीही सायकल, मोटार सायकलवरून ये-जा करीत असतात. पुलाचे कठडे तुटले आहेत. एक बाजूचा रस्ता खचला आहे, तर अनेक ठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत. समोरून अवजड वाहन आल्यास त्यास बाजू देताना अपघात होण्याची शक्यता बळावत असल्याने या पुलाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, या पुलाचे बांधकाम अकलूज सा.बां.उपविभागाकडून करण्यात आले आहे. सध्या देखभालीसाठीही हा पूल त्यांच्याकडेच आहे. हा पूल इंदापूर उपविभागाकडे वर्ग करावा, अशीही मागणी आहे.

Web Title: Bhima river bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.