शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
4
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
5
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
6
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
7
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
8
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
9
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
10
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
11
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
12
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
13
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
14
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
15
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
16
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
17
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
18
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
19
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
20
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...

भीमा कोरेगाव : जिल्हाभर उमटले पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 02:56 IST

भीमा कोरेगाव (ता. शिरूर) येथील दोन गटांत झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शहरात भीम-छावा संघटना, आरपीआय आदी संघटनांनी शहरातून शांततेत मोर्चा काढला. या मोर्चामुळे शहरातील व्यापा-यांनी स्वत:हून दुकाने बंद ठेवली.

शिरूरमध्ये शांततेसाठी मोर्चाशिरूर : भीमा कोरेगाव (ता. शिरूर) येथील दोन गटांत झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शहरात भीम-छावा संघटना, आरपीआय आदी संघटनांनी शहरातून शांततेत मोर्चा काढला. या मोर्चामुळे शहरातील व्यापा-यांनी स्वत:हून दुकाने बंद ठेवली. मात्र, मोर्चेकºयांनीच व्यापाºयांना दुकाने उघडण्यास सांगून आमचा मोर्चा शांततेसाठी असल्याचे अप्रत्यक्षरित्या दाखवून दिले. भीमा कोरेगाव येथे जी घटना घडली. त्याचे तालुक्याचे गाव असणाºया शिरूरमध्ये तीव्र पडसाद उमटतील,असा काहींचा कयास असावा, मात्र शिरूर हे सर्वसामान्यांचे राज्यात आदर्श असणारे शहर आहे. सर्व समाजबांधव गुण्यागोविंदाने आणि समन्वयाने राहतात. याचा प्रत्यय राज्यात ज्या ज्या वेळी जातीय दंगली घडल्या त्यावेळी आला आहे. मात्र, प्रातिनिधीक स्वरूपात घटनेचा निषेध करण्यासाठी व उद्या (बुधवार) शहर बंदचे आवाहन करण्यासाठी भीम छावा, आरपीआयने केले. मोेर्चाचे निवेदन दिल्यानंतर नगरसेवक विनोद भालेराव, फुले-आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रामा झेंडे, भीम छावाचे शहराध्यक्ष प्रकाश डंबाळे, अविनाश शिंदे यांनी व्यापाºयांना दुकाने उघडण्यास सांगितले. मयूर भोसले, राकेश रणदिवे, अनिकेत तराळ, अक्षय ससाणे, अमित तराळ आदींसह कार्यकर्ते यावेळी मोर्चात सहभागी झाले.इंदापूरला महामार्गावर रास्ता रोकोइंदापूर : भीमा कोरेगाव दंगलीच्या निषेधार्थ आंबेडकरवादी विचारांच्या संघटनांनी मंगळवारी इंदापुरात सुमारे २ तास रास्ता रोको करीत इंदापुरात पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग अडवून धरला. बावडा व अंथुर्णे ही आजी-माजी आमदारांची गावे दिवसभर बंद ठेवण्यात आली होती. उद्या अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये इंदापुरातील संघटना सहभागी होणार असल्याने उद्या शहर बंद राहणार आहे.पोलीस प्रशासनाला कसलीही पूर्वसूचना न देता पुणे जिल्हा आरपीआयचे संघटक सचिव शिवाजीराव मखरे, तालुकाध्यक्ष संदीपान कडवळे, बाळासाहेब सरवदे, अमोल मिसाळ, नितीन झेंडे, हनुमंत कांबळे, बाळासाहेब मखरे, राकेश कांबळे, संजय सोनवणे, संदेश सोनवणे, विकास भोसले व इतर कार्यकर्त्यांनी सकाळी ११ ते २ या वेळात एसटी बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन केले. हिंदुत्ववादी कार्यकर्ते मिलिंद एकबोटे, जिल्हाधिकारी सौरभ राव, पुणे ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.आरपीआयचे बारामती लोकसभा विभागाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांनी निवेदनाद्वारे राज्यपालांकडे केली आहे.गुरुवारी नीरा बंदची हाकनीरा : भीमा-कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ नीरा (ता.पुरंदर) येथील दीपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटनेच्या वतीने गुरुवार (दि. ४) रोजी नीरा बंदचे आवाहन करण्यात आले आहे.नीरा पोलीस दूरक्षेत्राचे फौजदार राजेश माळेगावे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. यावेळी नीरेचे माजी उपसरपंच कुमार मोरे, दादा गायकवाड, अमोल साबळे, अनिल मेमाणे उपस्थित होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मार्गाने निषेध मोर्चा काढण्यात येणार असून निषेध सभा घेण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अमोल साबळे यांनी दिली.दौंडला कडकडीत बंददौंड : दौंड येथे भीम अनुयायांनी पुकारलेल्या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. कोरेगाव भीमा येथील घटनेचा निषेध करत संपूर्ण शहरात दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. भीमा कोरेगाव आणि वढू बुद्रुक येथील घटनेच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, भीमक्रांती सेना, भीम वॉरियर्स, बहुजन समाज पार्टी, दलित पँथर या संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच भीम अनुयायांनी हा बंद पुकारला होता.घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणला होता. मोर्चाची सांगता दौैंड पोलीस ठाण्याजवळ झाली. या वेळी आंदोलकांनी तहसीलदार बालाजी सोमवंशी, पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना निवेदन दिले. भीमा कोरेगाव आणि वढू बुद्रुक येथे काही समाजकंटकांनी दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यातच पोलिसांनी हल्लेखोरांना ताब्यात न घेता निरपराध वयोवृद्ध लोकांवरच लाठीमार केला. यात एका निष्पाप युवकाचा मृत्यू झाला. शासनाने या घटनेची त्वरित दखल घेऊन सीबीआय चौैकशी करावी तसेच दोषींवर त्वरित कडक कारवाई करून त्यांना शासन करावे आणि मनुवाद्यांना सहकार्य करणाºया पोलीस अधिकाºयांची तातडीने उचलबांगडी करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे. दौंड येथील मोर्चात प्रकाश भालेराव, सतीश थोरात, रोहीत कांबळे मच्छींद्र डेंगळे, अश्विन वाघमारे, राजेश मंथने संजीव आढाव, राजू त्रिभूवन, प्रमोद राणेरचपूत, भारत सरोदे, शितल मोरे, आशा मोहीते, शोभा वाल्मिकी, यांच्यासह भीम अनुयायी सहभागी झाले होते.मृत तरुणाच्या कुटुंबीयांना मिळावी आर्थिक मदतलोकमत न्यूज नेटवर्ककान्हूर मेसाई : कान्हूर मेसाई (घोलपवाडी) येथील राहुल बाबाजी फटांगडे (वय २५) या तरुणाचा डोक्यात दगड लागून मृत्यू झाला. गरीब कुटुंबातील या तरुणाचे सणसवाडी येथे गॅरेज असून दुचाकी दुरूस्त करून आपला प्रपंच चालवत होता. तो गेल्यामुळे संपूर्ण कुटुंबच पोरके व निराधार झाले आहे. शासनाने या घटनेची गंभीर दखल घेत मृत तरुणाच्या कुटुंबीयांस भरीव आर्थिक मदत करावी, अशी मागणी सरपंच दादा खर्डे, माजी उपसरपंच दीपक तळोले यांनी केले.दरम्यान या तरुणाचा अंत्यविधी रात्री उशीरा घोलपवाडी येथे पोलीस बंदोबस्तात करण्यात आला. यावेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले. हक यांच्या उपस्थितीत घोलपवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ कान्हूरमेसाई येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.

टॅग्स :PuneपुणेBhima-koregaonभीमा-कोरेगाव