शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील भिडे वाडा होणार राष्ट्रीय स्मारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 20:46 IST

भिडेवाडा हे राष्ट्रीय स्मारक होणार असल्याने त्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही. महापालिकेसमोर असलेल्या सर्व अडचणी दूर करण्यासाठीही सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल.

ठळक मुद्देनागपुरात गिरीश बापट यांची घोषणा : राज्य सरकारचे महापालिकेला आदेशभिडे वाड्याची पाहणी करून त्याचा मास्टर प्लॅन तयार केला जाणार राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागालाही तशा स्पष्ट सुचना

पुणे:  नागपूर येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात स्त्री शिक्षणाचे उगमस्थळ अर्थातच भिडेवाडा हे राष्ट्रीय स्मारक होणार असल्याची घोषणा पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली . हे राष्ट्रीय स्मारक असेल. त्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही याची काळजी सरकार घेईल. महापालिकेसमोर असलेल्या सर्व अडचणी दूर करण्यासाठीही सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल. राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागालाही तशा स्पष्ट सुचना देण्यात आल्या आहेत. भूसंपादन करण्यासाठी महापालिकेला जिल्हाधिकारी कार्यालय मदत करेल. स्मारकाचा आराखडा तयार करण्यासाठी नामवंत कलाकारांकडून कल्पना मागवण्यात येतील. देशाला उर्जा देणारे स्थळ म्हणून या स्मारकाची गणना होईल असा विश्वास बापट यांनी व्यक्त केला. --------------राज्य सरकारने अत्यंत चांगला निर्णय घेतला आहे. महापालिकेसमोर काही अडचणी होत्या. त्या आता दूर होतील. आद्य स्त्रिशिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी समस्त महिला वर्गाच्या आदर्श आहेत. स्मारकातून त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळेल. महापालिकेकडूनही निधी उपलब्ध करून दिला जाईल.मुक्ता टिळक, महापौर.........................महापालिकेच्या वारसास्थळांच्या यादीत भिडे वाड्याचा समावेश आहेच. काही वर्षे त्यासाठी निधीची तरतुदही होत आहे. यापुर्वी एकदा स्मारक करण्यासाठी प्रयत्न झाला होता, मात्र, भूसंपादनात काही अडचणी आल्यामुळे तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. आता सरकारने निर्णय घेतल्यामुळे अडचण येणार नाही असा विश्वास बाळगायला हरकत नाही.शाम ढवळे- निवृत्त अभियंता व हेरिटेज विभागप्रमुख, महापालिका-----------------सरकारच्या निर्णयाचे स्वागत आहे. भिडे वाड्याची पाहणी करून त्याचा मास्टर प्लॅन तयार केला जाईल. त्यापूर्वी वाड्याची पाहणी करणे गरजेचे आहे. पदाधिकारी, स्थानिक नगरसेवक यांचा सहभाग आराखडा तयार करताना घेतला जाईल. वाडा वारसास्थळांच्या यादीत असल्याने आता कसली अडचण येणार नाही. हर्षदा शिंदे- हेरिटेज विभाग प्रमुख अभियंता, महापालिका

टॅग्स :PuneपुणेSavitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेgirish bapatगिरीष बापटMukta Tilakमुक्ता टिळक