शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

भुयार खणून दरोडा प्रकरण : लॉकरबाबत रिझर्व्ह बँकेच्या नियमांची पायमल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 06:49 IST

ज्या इमारतीत बँकेची लॉकररूम आहे, ती रूम सर्व बाजूने आरसीसी काँक्रिटने बांधकाम केलेली असावी़ तसेच जर लॉकररूम तळमजल्यावर असेल, तर तिचे चारही बाजूंबरोबरच फ्लोअरिंग आणि छतही आरसीसीचे बांधकाम केलेले असावे, अशी रिझर्व्ह बँकेची नियमावली आहे़

पुणे : ज्या इमारतीत बँकेची लॉकररूम आहे, ती रूम सर्व बाजूने आरसीसी काँक्रिटने बांधकाम केलेली असावी़ तसेच जर लॉकररूम तळमजल्यावर असेल, तर तिचे चारही बाजूंबरोबरच फ्लोअरिंग आणि छतही आरसीसीचे बांधकाम केलेले असावे, अशी रिझर्व्ह बँकेची नियमावली आहे़ नवी मुंबईतील भुयार खणून बँक आॅफ बडोदाचा लॉकर तोडून दरोडा घालण्यात आला़ या घटनेत रिझर्व्ह बँकेने जे नियम केले आहेत, त्याची पायमल्ली झाली असावी, असे मत पुण्यातील बँक क्षेत्रातील नामवंतांनी व्यक्त केले़नवी मुंबईतील जुईनगर येथील बँक आॅफ बडोदाच्या शाखेच्या लॉकर रूमखाली भुयार खोदून दरोडा घालण्यात आला आहे़ याबाबत पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष आणि पुणे पीपल्स बँकेचे माजी अध्यक्ष अ‍ॅड़ सुभाष मोहिते यांनी सांगितले, की कोणत्याही बँकेच्या शाखेमध्ये लॉकर सुविधा सुरू करायची असेल, तर त्या ठिकाणी बँकेच्या लॉकर रूमला चारही बाजूने आरसीसीचे काँक्रिटचे बांधकाम असले पाहिजे़ या ठिकाणी तीनच बाजूने आरसीसी केले असल्याचे दिसते़ जर लॉकर रूम तळमजल्यावर असेल, तर तिचे फ्लोअरिंगही किमान १ फूट जाडीचे आरसीसीचे, तसेच सीलिंगही आरसीसीचे असावे असा नियम आहे़ त्यामुळे कोणीही ते फोडायचा प्रयत्न केला, तर सहजासहजी फोडता येणार नाही आणि तसा प्रयत्न झालाच तर त्याचा आवाज होऊन आजूबाजूच्या लोकांना समजू शकते़ नवी मुंबईमध्ये घडलेल्या घटनेत चोरट्यांनी जागेचा पूर्ण अभ्यास करून हा दरोडा टाकला असल्याचे दिसून येते व याची तयारी अनेक दिवस अगोदरपासून सुरू असण्याची शक्यता आहे़ यात नक्कीच बँकेचा हलगर्जीपणा झाला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते़लॉकररूममध्ये आम्ही एकावेळी एकाच व्यक्तीला सोडतो़ आमच्या मॅनेजरने मास्टर की लावून लॉक उघडून दिले, की तो तेथे थांबत नाही़ ग्राहकाची येण्याची वेळ आणि जाण्याची वेळ नोंदवून ठेवली जाते़ जर एखाद्या ग्राहकाची चावी हरविली तर ते लॉकर कंपनीकडून ग्राहकाच्या उपस्थितीत तोडावे लागते़ त्याची डुप्लिकेट चावी बनविली जात नाही़ जर एखाद्या लॉकरमध्ये वर्षभर कोणतीही देवघेव झाली नाही़ ते उघडले गेले नाही तर रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार त्या ग्राहकाला नोटीस पाठवून बोलवावे़ तरी तो आला नाही तर पंचनामा करून ते लॉकर उघडण्याची बँकेला परवानगी असते, असे अ‍ॅड़ मोहिते यांनी सांगितले़महाराष्ट्र को-आॅप. बँकर्स फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी सांगितले, की बँकेच्या लॉकरसाठीचे नियम अगदी स्पष्ट आहेत़ लॉकररूम ही सर्व बाजूने आरसीसी भिंतींनी मजबूत असावी़ जेणेकरून ती कोणाला तोडता येऊ नये़ या ठिकाणी हवा खेळती राहावी, यासाठी एअरफॅनही किती लांबी-रुंदीचा असावा, याचाही नियम आहेत़ ती जागा इतकी छोटी असावी, की जेणेकरून तो काढला तरी त्यातून कोणी आत जाऊ शकणार नाही़लॉकरसाठी वापरण्यात आलेले पोलाद हे जाड आणि मजबूत असते़ ते गॅसकटरशिवाय तोडता येत नाही़ त्यामुळे चोरट्यांनी खूप प्रयत्न करून हा दरोडा टाकल्याचे दिसते़नवी मुंबईतील या घटनेत एक नवी अडचण आली आहे़ बँक ग्राहकांना सुरक्षिततेसाठी लॉकरची सुविधा पुरविते़ पण त्या लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूची जबाबदारी बँकेवर नसते़ पण, इथं लॉकरच तोडण्यात आल्याने रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे़ त्यामुळे आता कोणी ग्राहकाने जर आपल्या लॉकरमध्ये दागदागिने, पैसाअडका असल्याचा दावा केला, तर त्यांना ते पुराव्यासह पटवून द्यावे लागेल़ याशिवाय लॉकरचा विमा असतो़ या विम्यापेक्षा अधिक दावे आले तर या परिस्थितीत बँकेला जबाबदारी स्वीकारावी लागेल़बँकेच्या लॉकररूमसाठी रिझर्व्ह बँकेची नियमावली स्पष्ट असतानाही या ठिकाणी त्याचे उल्लंघन झाले असल्याचे दिसून येत असल्याचे एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या अधिकाºयाने सांगितले़

टॅग्स :bankबँकReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकPuneपुणेRobberyदरोडा