शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बनावट रेमडेसिविर प्रकरणात इंदापूर तालुक्यातील भवानीनगरच्या डॉक्टरला अटक; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 17:22 IST

गेल्या महिन्यात तालुका पोलिसांनी बनावट रेमडेसिविर इंजेक्शन तयार करुन ती विकणारी टोळी रंगेहाथ पकडली होती.

बारामती : बारामती तालुका पोलिसांना बनावट रेमडेसिविर बनविणारी टोळीची पाळेमुळे शोधुन काढण्यात यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी भवानीनगर (ता.इंदापुर) येथील डॉक्टरला गजाआड केले आहे. या रॅकेटमध्ये डॉक्टरचाही सहभाग निष्पन्न झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तो डॉक्टर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आता भवानीनगर (ता. इंदापूर) येथील डॉ. स्वप्निल अंकुश नरुटे (वय २९, रा. काझड, ता. इंदापूर) याला  पोलिसांनी अटक केली  आहे.  तो या टोळीकडून इंजेक्शन घेऊन ती विकण्याच्या बदल्यात तीन हजार रुपयांचे कमिशन घेत होता. कमिशन पोटी त्याने घेतलेली रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे. 

गेल्या महिन्यात तालुका पोलिसांनी बनावट रेमडेसिविर इंजेक्शन तयार करुन ती विकणारी टोळी रंगेहाथ पकडली होती.पोलिसांनी त्यासाठी 'स्टिंग ऑपरेशन' राबविले होते. कोरोना संकट काळात रेमडेसिविरची मोठ्या प्रमाणात मागणी असताना या टोळीने पॅरासिटोमॉल गोळ्यांचे पाणी तयार करत ते कुपीत भरून विकण्याचा धंदा सुरु केला होता. ३० ते ३५ हजार रुपयांना एक इंजेक्शन विकले जात असल्याची माहिती पोलीस चौकशीत पुढे आली होती. या बनावट इंजेक्शनमुळे पवारवाडी (ता. फलटण) येथील स्वप्निल जाधव या कोरोनाबाधिताला आपला जीव गमवावा लागला होता.

या प्रकरणात काटेवाडीजवळील मासाळवाडी येथील दिलीप ज्ञानदेव गायकवाड याच्यासह प्रशांत घरत (रा. भवानीनगर), शंकर दादा भिसे (रा. काटेवाडी, ता. बारामती), संदीप संजय गायकवाड (रा. कसबा, बारामती), दयानंद उद्धव गोसावी व  कृष्णा शशीराव जेवाडे (रा. जवाहरनगर, इंदापूर रोड, बारामती) यांच्यासह डॉ. स्वप्निल नरुटे व एका अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.  पोलिसांनी या टोळीविरोधात यापूर्वी सदोष मनुष्यवधासह अन्य कलमांनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ————————————————

टॅग्स :BaramatiबारामतीIndapurइंदापूरCrime Newsगुन्हेगारीdoctorडॉक्टरArrestअटकremdesivirरेमडेसिवीर