शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

गुजरातमधील जांभळांनी खाल्ला भाव; एका किलोला २०० रुपये

By अजित घस्ते | Updated: April 28, 2023 14:03 IST

मधुमेहावर गुणकारी मानले जात असल्याने मार्केट यार्ड बाजारात जांभळाला मागणी वाढली

पुणे: मधुमेहावर गुणकारी मानले जात असल्याने मार्केट यार्ड बाजारात जांभळाला मागणी वाढली आहे. बाजारात जांभळाचा हंगाम सुरू झाल्याने गावरान जांभळाबरोबरच गुजरातच्या लांबलचक काळ्याभोर जांभळांना मागणी वाढत आहे. या जांभळाला घाऊक बाजारात प्रतवारीनुसार किलोला १२० ते २०० रुपये भाव मिळत आहे, तर किरकोळ बाजारात २५० रुपये किलो भाव मिळत आहे.

गुजरातच्या सौराष्ट्र भागातून जांभळांची आवक मार्केट यार्डातील फळबाजारात सुरू झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा गुजरातमधील जांभळांची आवक वाढली असून सध्या दीड ते २ टन मालाची आवक होत आहे. जांभळांचा हंगाम दरवर्षी एप्रिल महिन्यात सुरू होतो. तो जुलैपर्यंत सुरू असतो. कर्नाटकातील जांभळांची आवकही तुरळक प्रमाणावर होत असल्याचे मार्केट यार्डातील जांभूळ व्यापारी माऊली आंबेकर आणि पांडुरंग सुपेकर यांनी दिली.जांभळांची गुजरात, कर्नाटक, तळकोकणातील सावंतवाडी भागातून मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. त्यासोबतच पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यातील गावरान जांभळांचीही आवक सुरू आहे. जांभळांपासून सरबतही तयार केले जाते. पर्यटनस्थळांवरून जांभळांना चांगली मागणी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जांभळांची लागवड चांगली झाल्याने मागणीही वाढली आहे.

''गुजरातमधील जांभळे आकाराने मोठी आणि आकर्षक असतात तसेच चवीला गोड असतात. गावरान जांभळे आकाराने लहान आणि खायला कमी गोड असतात. गुजरातसोबतच कर्नाटकातील जांभळांची आवक येत्या काही दिवसांत सुरू होईल. एक किलो जांभळाला प्रतवारीनुसार १२० ते २५० रुपयांचा भाव आहे. - पांडुरंग सुपेकर व्यापारी''

टॅग्स :Puneपुणेfoodअन्नfruitsफळेSocialसामाजिकMarketबाजार