शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टची पोलिसांत तक्रार दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 15:08 IST

पुणे महानगरपालिकेने शासकीय अधिकृत वेबसाईटवरून भाऊसाहेब रंगारी यांचे नाव अचानक काढून टाकल्याने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टने पुणे पोलीस दलातील सायबर सेलकडे पुणे महापालिकेच्या सायबर सेल व संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दिली आहे़. 

ठळक मुद्देमहापालिकेने अचानक काढून टाकले नाव : सायबर सेलकडे तक्रार

पुणे : भारतातील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने पुणे महानगरपालिकेने शासकीय अधिकृत वेबसाईटवरून भाऊसाहेब रंगारी यांचे अचानक नाव काढून टाकल्याने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी उर्फ भाऊसाहेब लक्ष्मण जावळे गणपती ट्रस्टने पुणे पोलीस दलातील सायबर सेलकडे पुणे महापालिकेच्या सायबर सेल व संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दिली आहे़. भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे कायदा सल्लागार अ‍ॅड. मिलिंद  पवार  व भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट च्या वतीने सचिव राजेंद्र गुप्ता, विश्वस्त सुरज रेणुसे, बाळासाहेब निकम यांनी माहिती दिली़.   ब्रिटिश राजवटीत ब्रिटिशांनी जमावबंदीचे आदेश दिले होते. तसेच स्वातंत्र्याचा लढा त्यावेळी जोरात चालू होता. लोकांनी एकत्र येवून काहीतरी करणे गरजेचे झाले होते व तत्कालीन क्रांतिकारकांची बैठक भाऊसाहेब रंगारी यांच्या बुधवार पेठ सध्याचे रंगारी भवन येथे पार पडली होती व घरातला गणपती सार्वजनिकरित्या रस्त्यावर बसवून ऊत्सवाचे स्वरूप देण्याचे ठरले व त्यानुसार सर्वात प्रथम १८९२ मध्ये भाऊसाहेब रंगारी यांनी पुण्यात गणपती सार्वजनिक गणेशाची प्रतिष्ठापना करत गणेशोत्सव साजरा केला.लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी १८९४ मध्ये प्रथम पुणे येथे विंचूरकर वाड्यात गणपती बसविला. व त्यानंतर गणपती ऊत्सवाचा मोठ्या प्रमाणावर प्रचार व प्रसार केला.श्रीमंत भाऊसाहेब रंगारी व टिळक दोघांचा उद्देश ब्रिटिश राजवटीविरुद्ध व स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लढा उभा करायचा हाच होता. त्यामुळे भाऊसाहेब रंगारी हेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे खरे जनक आहेत. त्यांचे श्रेय त्यांना मरणोत्तर मिळावे व खरा इतिहास बाहेर यावा यासाठी भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट काही वर्षं प्रयत्न करत आहे.         भाऊसाहेब रंगारी यांनी त्या काळात इको फ्रेंडली मूर्ती बनविली तीच आजही बसविली जाते. फक्त आणि फक्त क्रांतीच्या संकल्पनेतून उभारलेल्या गणेशोत्सवाचे प्रतिक म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब यांनी साकारलेली दृष्ट प्रवृत्तीशी दोन हात करणारी श्रींची ईको फ्रेंडली लढाऊ काव्यातील मूर्ती. आशीर्वाद देण्यासाठीचा हात ही संकल्पनाच यावेळी राबवली गेली नाही, कारण जे काय ते लढूनच घ्यायचे आहे. आणि १९ व्या शतकाच्या शेवटी ज्या संकल्पनेतून गणेशोत्सव भाऊसाहेब रंगारी आणि या त्यांच्या सोबत्यांनी अवलंबला त्याच शिकवणीतून आजच्या काळातही उभारलेल्या संविधानिक लढ्याला यश आले म्हणावे लागेल.          पुणे महानगर पालिकेच्या अधिकृत वेबसाईटवरती सार्वजनिक गणेशोत्सवाचे खरे जनक म्हणून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांची नोंद केली असून गणेशोत्सवाचे साल १८९२ च नमूद केले आहे़. त्यामुळे भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे पुणे महानगरपालिकेचे महापालिकेत झालेल्या बैठकीत आभार मानले व लगेचच त्याच रात्री बाराच्या सुमारास महानगरपालिकेच्या वेबसाईट वरून १८९२ सालात भाऊसाहेब रंगारी यांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरूवात केली असा मजकूर होता. हा मजकूर अचानक काढून टाकण्यात आला.          महानगरपालिकेच्या या कृत्याविषयी व इतिहासाची मोडतोड केली, खोटा इतिहास पसरविला, खरा इतिहास लपवून ठेवून समाजाची दिशाभूल केली. म्हणून पोलीस आयुक्त पुणे, पोलीस निरीक्षक सायबर सेल, महापालिका आयुक्त, महापालिका सायबर सेल प्रमुख व महापौर यांचेकडे रीतसर तक्रार दाखल केली आहे असे त्यांनी सांगितले़. 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाGaneshotsavगणेशोत्सवcyber crimeसायबर क्राइम