श्रेय लाटण्यासाठी परस्पर भूमिपूजन
By Admin | Updated: September 5, 2014 00:57 IST2014-09-05T00:57:26+5:302014-09-05T00:57:26+5:30
आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर विकासकामांचे श्रेय लाटण्यासाठी लोकप्रतिनिधींनी परस्पर भूमिपूजन व उद्घाटनाचा सपाटा लावला आहे.

श्रेय लाटण्यासाठी परस्पर भूमिपूजन
पुणो : आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर विकासकामांचे श्रेय लाटण्यासाठी लोकप्रतिनिधींनी परस्पर भूमिपूजन व उद्घाटनाचा सपाटा लावला आहे.
सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे
उद्यानात ‘कलाग्राम’ उभारणीच्या
कामांचे भूमिपूजन आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. मात्र, त्याविषयी महापालिका पदाधिकारी व प्रशासन अंधारात होते.
दिल्ली हटच्या धर्तीवर महापालिकेच्या वतीने पु. ल. देशपांडे उद्यानात कलाग्राम साकारण्यात येणार आहे. त्याठिकाणी विविध कलाकारांनी तयार केलेली कलाकुसर व कलेचे सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यानुसार विविध दालने, प्रेक्षागृह व एम्पी थिएटर उभारण्यात येणार आहे. त्याला हेरिटेज म्हणून जुन्या वाडय़ांचा लूक देण्यात येणार आहे. अशा पद्धतीने कलाग्राम साकारण्याच्या प्रस्तावावर महापौरांच्या अध्यक्षतेखाली पक्षनेत्यांच्या बैठकीत चर्चा व निर्णय होणो अपेक्षित आहे. त्यानंतर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला प्रशासकीय मान्यता मिळते.
मात्र, प्रभाग क्रमांक 53 चे नगरसेवक श्रीकांत जगताप व मंजूषा नागपुरे
यांनी महापौरांच्या मान्यतेशिवाय
आणि प्रशासनाला अंधारात ठेवून
आमदार मिसाळ यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम आज घेतला. राष्ट्रवादीचे सदस्य अरविंद गोरे, अमेय जगताप, बाबासाहेब पाटील, गोविंद थरकुडे व डॉ. शंतनू जगदाळे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
आत्तार्पयत न केलेल्या विकास कामांचे श्रेय घेण्याचे प्रकार भाजपाच्या नगरसेवकांनी अनेकदा केलेले आहेत. पक्षनेते व नाव समितीच्या मान्यतेशिवाय भूमिपूजन व नामांकरणाची प्रथा चुकीची आहे. त्यामुळे महापालिकेच्या नियमानुसारच कलाग्रामचे भूमिपूजन करण्यात येईल.
- चंचला कोद्रे, महापौर.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी यापूर्वी भाजपाने केलेल्या कामांची उद्घाटने परस्पर केलेली आहेत. कलाग्रामच्या भूमिपूजनासाठी भाजपाच्या नगरसेवकांनी शासकीय मान्यता घेतली आहे. तरीही राष्ट्रवादी विनाकारण राजकारण करीत आहे.
-माधुरी मिसाळ, आमदार