शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

गेल्या आठ महिन्यांपासून भाटघर वीजनिर्मिती केंद्र बंद; आतापर्यंत ११ कोटींचे नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 14:33 IST

मुसळधार पावसामुळे भाटघर येथील वीजनिर्मिती केंद्रात शिरले होते पाणी

ठळक मुद्देकेंद्रात दुरुस्तीच्या कामाला सुरुवात, दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

भोर : मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भाटघर येथील विद्युत मंडळाच्या महापारेषण व वितरण कंपनीच्या वीजनिर्मिती केंद्रात पाणी शिरल्यामुळे यावर्षी वीजनिर्मिती केंद्र मागील आठ महिने बंद आहे. यामुळे आतापर्यंत ४० मिलियन युनिटचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत ११ कोटींचे नुकसान झाले आहे आणि कदाचित यात वाढ होऊ शकते. वीजनिर्मिती केंद्रात अशा प्रकारचे नुकसान पहिल्यांदाच झाले आहे. सध्या दुरुस्तीचे काम सुरू असून पुढील दोन महिन्यांत काम पूर्ण करण्याचा अंदाज व्यक्त केला जात असला, तरी काम पूर्ण होईल की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.पाच ऑगस्टला झालेल्या मुसळधार पावसामुळे भाटघर येथील वीजनिर्मिती केंद्रात पाणी जाऊन मागील आठ महिन्यांपासून वीजनिर्मिती केंद्र बंद असून मागील चार वर्षांत वीजनिर्मिती केंद्र बंद पडण्याची ही पहिलीच घटना असून त्यामुळे आतापर्यंत सरासरी ४० मिलीयन युनिटच्या विजेचे आणि सुमारे ११ कोटींचे नुकसान झाले असून त्यात वाढही होऊ शकते. मात्र हे सर्व अंदाज वीज केंद्राच्या दुरुस्तीच्या कामानंतरच नुकसानीचा अंदाज येणार असल्याचे भाटघर वीज उपकेंद्राचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विश्वास देशपांडे व भाटघर विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता सुनील वाल्हेकर यांनी सांगितले.सध्या भाटघर येथील वीजनिर्मिती केंद्राच्या दुरुस्तीचे युद्धपातळीवर काम सुरू असून पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे.मे अखेर काम पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मागील वर्षी ३ ते ५ आॅगस्ट दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे ४ आॅगस्टला भाटघर धरण पूर्ण भरल्यावर पाणी येथील वीजनिर्मिती केंद्राच्या पहिल्या दोन मजल्यांवर शिरल्यामुळे रोहित्र पॅनल जळाले. जनरेटर पाण्यात गेले, त्यामुळे भोर शहरासह सुमारे ६० गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर भोरच्या अग्निशमन बंबाने व वीज वितरण महापारेषण कंपनी एक आठवडाभर वीज केंद्रातील पाणी बाहेर काढत होते. यावेळी सलग तीन-चार दिवस आमदार संग्राम थोपटे घटनास्थळी राहून वीजनिर्मिती कंपनीला मदतकार्य करून कामकाजाची माहिती घेत होते.........

पर्यायी व्यवस्था : ६० गावांचा वीजपुरवठा होणार पूर्ववतवीज वितरण कंपनीच्या वीज मंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांनी युद्धपातळीवर पर्यायी व्यवस्था करून शहरासह ग्रामीण भागातील ६० गावांचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत केला. यातून निर्माण झालेली वीज १३२ केव्ही कामथडी आणि शिरवळ केंद्राला पुरवली जाते. साधारणपणे धरणातील पाणी दरवर्षी आॅक्टोबर ते मेअखेरपर्यंत दुष्काळी भागातील पिकांसाठी व पिण्यासाठी सोडले जाते. त्या कालावधीत वीजनिर्मिती केली जाते............* पावसाच्या पाण्यामुळे वीजनिर्मिती कें द्रातील जनरेटर, तळाचे टर्बाईन, बॅटरी, कॉम्पॅक्टर, आॅईल, वायरिंग यासारखे पूरक साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जनरेटर बाहेर काढायला एक महिना लागला असून जनरेटर, हिटिंग, ड्राइंगचे काम सुरू असून त्याच्या दुरुस्तीसाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

* काम पूर्ण झाल्यावरच झालेले नुकसान व खर्च याची महिती कळू शकणार आहे. दरवर्षी ४० मिलियन युनिटची वीजनिर्मिती केली जाते. मागील वर्षी ५४ मिलीयन युनिट वीजनिर्मिती झाली होती आणि यावर्षी अधिक वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.

* पावसामुळे सर्वच अंदाज फेल ठरले असून वीजनिर्मिती केंद्राच्या दुरुस्तीचे अवघड काम पारेषण व वितरण कंपनीवर येऊन पडले आहे. 

टॅग्स :bhor-acभोरelectricityवीजRainपाऊस