शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
2
नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई : भेसळ युक्त तुपाचे १०० डब्बे ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 2:33 PM

साडेचार लाखाचे गायीचे भेसळ युक्त तूप

कात्रज: आंबेगाव भागातील अभिनव कॉलेज समोरून सुमारे १०० डब्बे तूप घेऊन जाणारा टेम्पो पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना संशय आल्याने चेक केला.यावेळी चालकाने उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने पोलिसांनी त्याची चौकशी केली असता हे भेसळ युक्त गायीचे तूप असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.          याविषयी माहिती देताना भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांनी सांगितले की,१२ डिसेंबर ला आंबेगाव परिसरातील अभिनव कॉलेज जवळ मी व माझे सहकारी पेट्रोलीग करीत होतो.यावेळी आमचे कर्मचारी राहुल तांबे व सचिन पवार यांना या भागातून भेसळ युक्त तूप जात असल्याची माहिती मिळाली.काही गाड्याची चेकीग केल्यानंतर एक मेगा एक्सल कंपनीचा टेम्पो क्रमांक एम एच १२ आर एन २४५० टेम्पो आम्ही थांबवला यामध्ये कुटलाही मार्क,कपनीचे नाव नसलेले सुमारे १०० डब्बे तूप आढळले.गाडी चालक शिवराज हळमणी (रा.हत्तीकनबस,ता.अक्कलकोट,जी.सोलापूर) याने हा माल डीजीएम (देवक फुड्स कंपनी ) शिवणे येथील कंपनीतून घेतला असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने अन्न औषध प्रशासनाला याची माहिती कळवली.या विभागातील क्रांती बारवकर यांनी पाहणी करून हे भेसळ युक्त गायीचे तूप असल्याची खात्री केली.या कारवाई मध्ये सुमारे १४९९ किलो गायीचे तूप किमत अंदाजे साडेचार लाख रुपये पोलिसांनी जप्त केले आहे.ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर,पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर,पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे,पोलीस कर्मचारी संतोष भापकर,सोमनाथ सुतार,रविंद्र भोसले,सर्फराज देशमुख,सचिन पवार,अभिजित जाधव,गणेश शेंडे,राहुल तांबे,विक्रम सावंत यांनी केली

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीArrestअटकPoliceपोलिस