भरधाव वाहनाच्या धडकेने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:11 IST2021-07-31T04:11:40+5:302021-07-31T04:11:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाला. ही घटना नगर रस्त्यावर घडली. पवन ...

भरधाव वाहनाच्या धडकेने
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भरधाव वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाला. ही घटना नगर रस्त्यावर घडली. पवन प्रकाश गीते (वय १८, रा. लोणी कंद, ता. हवेली, नगर रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. बालाजी मुंडे (वय ३२) यांनी यासंदर्भात लोणी कंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोन दिवसांपूर्वी मुंडे यांचा भाचा दुचाकीवरून नगर रस्त्यावरून निघाला होता. त्या वेळी भरधाव वाहनाने त्याला धडक दिली. अपघातानंतर पसार झालेल्या दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक दीपक जाधव तपास करत आहेत.