शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Bharat Bandh : पुण्यात बंदला हिंसक वळण, पीएमपीची बस जाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 10:13 IST

पुण्यात भारत बंदला हिंसक वळण लागले आहे.

पुणे -  पुण्यात भारत बंदला हिंसक वळण लागले आहे.  या बंद दरम्यान कोथरुड डेपोमध्ये पीएमपी बस पेटवून देण्याची घटना पहाटे घडल्याची माहिती मिळत आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांकडून याबाबतचे व्हिडीओ तातडीने व्हायरल केल्याने बंद पार्श्वभूमीवर ही बस पेटली नसून पेटविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान कुमठेकर रोडवर मनसे कार्यकर्त्यांनी सकाळी सात वाजता एका पीएमपी बसवर दगडफेक करुन तिच्या काचा फोडल्याचं समोर आलं आहे. 

बसचे चालक व वाहक यांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे ते चिंचवड ही बस पार्किंगमधून टेस्टींग करुन बाहेर आणली व हजेरी लावण्यासाठी पुन्हा डेपोमध्ये गेलो होतो. त्यादरम्यान रस्त्यावर असणाऱ्या बसने पेट घेतला. त्यात संपूर्ण बस जळून खाक झाली आहे.बसचा पुढील बॉनेटच्या बाजूचा भाग पेटला होता. बसला आग लागली तर ती अशा प्रकारे पेटत नाही़ त्यामुळे भारत बंदच्या पार्श्वभूमीवर कोणीतरी ती पेटवून दिली अशी शंका व्यक्त केली जात आहे.

अग्निशामक दलाला या घटनेची माहिती सकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी मिळाली. त्यानंतर तातडीने गाडी घटनास्थळी जाऊन त्यांनी आग विझविली. पण तोपर्यंत संपूर्ण बस जळून खाक झाली होती. दरम्यान, कुमठेकर रोडवर सकाळी सात वाजता एका बसवर दगडफेक करुन काचा फोडण्यात आल्या. या दोन घटना वगळता आतापर्यंत शहरात शांतता असून सकाळी दूध व अन्य साहित्यांची विक्री करणारी दुकाने तसेच पीएमपी बस, रिक्षांची वाहतूक सुरू आहे़.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदPuneपुणे