शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भामा - आसखेड प्रकल्प, केळगाव व चिंबळी येथील जमिनींवरील राखीव क्षेत्राचे शेरे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 01:39 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने शेतकऱ्यांमध्ये आनंद

ठळक मुद्देमागील पंधरा ते वीस वर्षांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला अखेर यश

शेलपिंपळगाव : भामा - आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी केळगाव व चिंबळी (ता. खेड) गावातील जमिनींवरील राखीव क्षेत्र असलेले शेरे रद्द करण्यात आले आहेत. उपजिल्हाधिकारी पुनर्वसन यांच्याकडून तसा आदेशही प्राप्त झाल्याची माहिती तहसीलदार सुचित्रा आमले यांनी दिली. शासनाने घेतलेल्या या निर्णयाचे संबंधित दोन्ही गावातील शेतकऱ्यांमधून स्वागत होत आहे.            पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि.१५) जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधित विभाग व संबंधित शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. सदरच्या बैठकीत राज्यातील पाठबंधारे प्रकल्पांच्या लाभ क्षेत्रात सिंचन सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत व भविष्यातही अशा सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता नाही. त्यामुळे भामा आसखेड प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील मौजे केळगाव व चिंबळी गावातील स्लॅबपात्र शेतकऱ्यांची त्यांच्या ७/१२ वरील युक्त प्रकल्पांचे शेरे ०५ आॅगस्ट २०१९ च्या शासन निर्णयानुसार कमी करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली होती.         यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मौजे केळगाव व चिंबळी गावातील जमिनींवरील शेरे कमी करण्याची मागणी मान्य करून तसे आदेश तहसीलदार खेड यांना देण्यात आले आहेत.......................   भामा आसखेड प्रकल्पातील सिंचनासाठी असणारे पाणी पिण्याच्या पाणी वापरासाठी आरक्षित झाले आहे. सदरचा प्रकल्प हा शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून या धरणातून पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास पाणी मिळणार आहे. परंतु शेतकऱ्यांनी पाईपलाईनचे काम थांबविल्यामुळे प्रकल्पपूर्तीस विलंब होत आहे. त्यामुळे सदर गावातील इतर हक्कातील पुनर्वसनासाठी पात्र असे शेरे कमी करणे आवश्यक असल्याने मौजे केळगाव व चिंबळी गावातील जमिनींवरील शेरे कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

.........................मागील पंधरा ते वीस वर्षांपासून सदर गावातील जमिनींवरील इतर हक्कातील पुनर्वसनासाठी पात्र असे शेरे कमी करण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. अखेर या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. शासनाने उर्वरित गावांचाही प्रश्न मार्गी लावावा. यासाठीही पाठपुरावा सुरूच राहील.     - दिलीप मोहिते - पाटील, आमदार खेड.

टॅग्स :KhedखेडDamधरणFarmerशेतकरीNavalkishor Ramनवलकिशोर राम