शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

भामा आसखेड पुनर्वसनाचा तिढा कायम; जमिनीच्या बदल्यात पैशाचा ग्रामस्थांनी धुडकावला प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 13:51 IST

भामा आसखेड धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी ‘जमिनीच्या बदल्यात जमीन’ देणे शक्य नसल्याने ‘जमिनीच्या बदल्यात रोख रक्कम’ देण्याचा प्रस्ताव  नुकत्याच झालेल्या बैठकीत ग्रामस्थांसमोर ठेवण्यात आला; मात्र हा प्रस्ताव ग्रामस्थांनी धुडकावून लावला.

ठळक मुद्देधरणग्रस्त ग्रामस्थांशी सुरू असलेल्या बैठकीत अंतिम तोडगा नाहीजमीन उपलब्ध होत नसल्यामुळे मोबदला म्हणून ग्रामस्थांना रोख रक्कम देण्याचा प्रस्ताव : काळे

पुणे : भामा आसखेड धरणग्रस्तांच्या एकूण संख्येचा विचार करता त्यांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासनाकडे मुबलक जमीन उपलब्ध नाही. त्यामुळे ‘जमिनीच्या बदल्यात जमीन’ देणे शक्य नसल्याने ‘जमिनीच्या बदल्यात रोख रक्कम’ देण्याचा प्रस्ताव  नुकत्याच झालेल्या बैठकीत ग्रामस्थांसमोर ठेवण्यात आला; मात्र हा प्रस्ताव ग्रामस्थांनी धुडकावून लावला. परिणामी, भामा आसखेडच्या धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा तिढा अजूनही कायम आहे. जिल्हा प्रशासनासह पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने धरणग्रस्तांना जमिनीच्या बदल्यात जमीन देण्याचा प्रस्ताव समोर ठेवला होता; मात्र निळवंडे  येथील सर्व धरणग्रस्तांना ‘जमिनीच्या बदल्यात रोख रक्कम’ हे सूत्र अंमलात आणले गेले. त्यानुसार भामा आसखेड धरणग्रस्तांना रोख रकमेच्या स्वरूपात मोबदला देण्याचे जिल्हा प्रशासनाने ठरविले. त्यासंदर्भातील पत्रही पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांना पाठविण्यात आले; तसेच सुमारे ४५० धरणग्रस्तांना द्यावयाच्या रकमेचे मूल्यांकन करण्याचे कामही सुरू करण्यात आले; मात्र यासंदर्भात धरणग्रस्त ग्रामस्थांशी सुरू असलेल्या बैठकीत अंतिम तोडगा निघत नसल्यामुळे जिल्हा प्रशासनासह दोन्ही महापालिकांपुढील समस्या वाढणार असल्याचे दिसून येत आहे.पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असल्यामुळे धरणाच्या परिसरातील स्थानिक शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळू शकणार नाही. तसेच, या प्रकरणात काही जमीनमालक न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे हा प्रश्न सोडविण्यास आणखी काही कालावधी जाणार असल्याचे बोलले जात आहे.

भामा आसखेड हे धरण शंभर टक्के पिण्याच्या पाण्यासाठी राखीव आहे; तसेच सध्या या धरणातून बंदिस्त जलवाहिनीमधून दोन्ही महापालिकांसाठी पाणी नेण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. जिल्हा प्रशासनाने ग्रामस्थांना विनंती केल्यामुळे सध्या काम सुरळीतपणे सुरू आहे. परंतु, अद्याप पुनर्वसनाच्या मुद्द्यावर ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यात एकमत झालेले नाही. ग्रामस्थ जमिनीच्या बदल्यात जमिनीची मागणी करत आहेत. परंतु, जमीन उपलब्ध होत नसल्यामुळे मोबदला म्हणून ग्रामस्थांना रोख रक्कम देण्याचा प्रस्ताव आहे. - रमेश काळे, अप्पर जिल्हाधिकारी

टॅग्स :Puneपुणे