काँग्रेस भवनासमोर भजन आंदोलन
By Admin | Updated: February 5, 2017 03:45 IST2017-02-05T03:45:28+5:302017-02-05T03:45:28+5:30
उमेदवारी देण्यावरून निर्माण झालेला असंतोष शमविण्यास भाजपासह काही पक्षांना यश आले असतानाच काँग्रेसमध्ये मात्र ही नाराजी उद्रेकात रूपांतरीत होऊ लागली आहे. उमेदवारीचा

काँग्रेस भवनासमोर भजन आंदोलन
पुणे : उमेदवारी देण्यावरून निर्माण झालेला असंतोष शमविण्यास भाजपासह काही पक्षांना यश आले असतानाच काँग्रेसमध्ये मात्र ही नाराजी उद्रेकात रूपांतरीत होऊ लागली आहे. उमेदवारीचा शब्द मिळाला व नंतर उमेदवारी मिळाली नाही, अशा काही महिला व पुरुष उमेदवारांनी काँग्रेस भवनसमोर शनिवारी दिवसभर भजन आंदोलन केले.
ऐनवेळी आपली उमेदवारी कापण्यात आली, असा आरोप या आंदोलकांनी केला. आघाडी अचानक जाहीर करण्यात आली, चांगले प्रभाग राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आले व त्यातून उमेदवारी गेली, असेही काही जणांनी सांगितले. दुपारी ३ वाजता काँग्रेस भवनाबाहेर शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगीता तिवारी यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या महिलांनी ठिय्या मांडला. भजन करीत त्यांनी निषेध नोंदवला.
अविनाश बागवे यांनी या महिलांशी दुरध्वनीवर चर्चा केली व आंदोलन करू नये, अशी विनंती
केली, मात्र आघाडी करा, असा आग्रह कोणी
धरला त्यांची नावे जाहीर करा, अशी मागणी या महिलांनी केली. (प्रतिनिधी)