मौज अंकाला सर्वोत्तम दिवाळी अंक पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:16 IST2021-02-23T04:16:16+5:302021-02-23T04:16:16+5:30
पुणे: पुण्यभूषण फाउंडेशनच्या वतीने दर्जेदार दिवाळी अंकांना प्रोत्साहन मिळण्याच्या हेतूने घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेतून सर्वोत्तम दिवाळी अंक म्हणून ...

मौज अंकाला सर्वोत्तम दिवाळी अंक पुरस्कार
पुणे: पुण्यभूषण फाउंडेशनच्या वतीने दर्जेदार दिवाळी अंकांना प्रोत्साहन मिळण्याच्या हेतूने घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेतून सर्वोत्तम दिवाळी अंक म्हणून मौज या अंकाची निवड करण्यात आली आहे. पण सद्यस्थितीत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुरस्कार वितरण सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे, अशी माहिती पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी संजय भास्कर जोशी, महेंद्र मुंजाळ, वृषाली दाभोळकर आदी उपस्थित होते.
देसाई म्हणाले,
पुण्यभूषण सर्वोत्तम दिवाळी अंक पुरस्काराबरोबरच उत्तम साहित्यासही तीन पुरस्कार देण्यात आले आहेत. यंदा अरुण खोपकर यांना दीपावली या दिवाळी अंकातील बी फॉर ब्ल्यू बी फॉर बर्वे या लेखासाठी राजहंस प्रकाशन पुरस्कृत सर्वोत्तम ललित आणि वैचारिक लेखन पुरस्कार, जयंत पवार यांना पद्मगंगा या दिवाळी अंकातील अंतकाळ लेखासाठी पॉप्युलर प्रकाशन पुरस्कृत सर्वोत्तम कथात्मक पुरस्कार, वसंत डहाके यांना उद्याचा मराठवाडा या दिवाळी अंकातील पोस्टकार्ड या लेखासाठी वर्णमुद्रा प्रकाशन पुरस्कृत सर्वोत्तम कविता पुरस्कार असे तीन पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
दहा वाचन स्वयंसेवकांच्या प्राथमिक गुणांकनानंतर सदा डुंबरे, हरी नरके, नीरजा, संजय भास्कर जोशी, रेखा इनामदार -साने, नितीन वैद्य यांच्या निवड समितीने सर्व निवडी केल्या. १२६ अंक निवड समितीकडे आले होते. स्पर्धेला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता पुढील किमान १० वर्षे हा पुरस्कार सातत्याने देण्यात येणार आहे.