संजय जोहरे यांना बेस्ट आर्ट टीचर अवॉर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:10 IST2021-03-07T04:10:13+5:302021-03-07T04:10:13+5:30

पुण्यातील आर्ट बिटस् फाऊंडेशन ही संस्था चित्र, शिल्प, नृत्य , नाट्य, गायन-वादन या कला क्षेत्रात संघर्षातून स्वतः ला सिद्ध ...

Best Art Teacher Award to Sanjay Johre | संजय जोहरे यांना बेस्ट आर्ट टीचर अवॉर्ड

संजय जोहरे यांना बेस्ट आर्ट टीचर अवॉर्ड

पुण्यातील आर्ट बिटस् फाऊंडेशन ही संस्था चित्र, शिल्प, नृत्य , नाट्य, गायन-वादन या कला क्षेत्रात संघर्षातून स्वतः ला सिद्ध करून पुढे आलेले तरूण कलावंत, आपापल्या कला क्षेत्रातील अनुभवी कलावंत व ज्येष्ठ कलावंत यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व सन्मान मिळवून देण्याचे काम राष्ट्रीय स्तरावर करते.

जोहरे यांनी विद्यालयात चित्रकला स्पर्धेद्वारे सामाजिक विषयांचा प्रसार करणे, शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेचा उत्कृष्ट निकाल, स्व:निर्मित कार्यक्रम पत्रिका, प्रभावीपणे राबवलेले विविध कलाविषयक उपक्रम याद्वारे स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. यापार्श्वभूमीवर कलाशिक्षक जोहरे यांना बेस्ट आर्ट टीचर अवॉर्ड हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

फोटो : राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संजय जोहरे यांचा सत्कार करताना मान्यवर.

Web Title: Best Art Teacher Award to Sanjay Johre