समाजातील तळागाळातील घटकांना शिवभोजन थाळीचा लाभ : सुनेत्रा पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:13 IST2021-07-14T04:13:38+5:302021-07-14T04:13:38+5:30
बारामती : शिवभोजन थाळीचा लाभ समाजातील तळागाळातील घटकांना होत आहे. या थाळीचा दर्जा उत्तम राखला पाहिजे, असे ...

समाजातील तळागाळातील घटकांना शिवभोजन थाळीचा लाभ : सुनेत्रा पवार
बारामती : शिवभोजन थाळीचा लाभ समाजातील तळागाळातील घटकांना होत आहे. या थाळीचा दर्जा उत्तम राखला पाहिजे, असे आवाहन बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.
बारामतीतील निर्मिती व सावित्रीबाई फुले महिला बचत गटाच्या माध्यमातून तालुका महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा वनिता बनकर यांच्या नेतृत्वाखालील शिवभोजन थाळी केंद्राचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. पवार पुढे म्हणाल्या, बारामती शहरातील हे तेरावे शिवभोजन थाळी केंद्र आहे. या केंद्रावर दररोज दुपारी शंभर थाळी गरजूंना दिली जाणार आहे, यात वरण, भात, चपात्या व भाजी यांचा समावेश असेल, असे वनिता बनकर यांनी नमूद केले. या माध्यमातून महिला बचत गटाच्या महिलांना रोजगारही प्राप्त झाला आहे.
यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती नीता फरांदे, बारामती बँकेचे अध्यक्ष श्रीकांत सिकची, गटनेते सचिन सातव, सीमा चिंचकर, सुहासिनी सातव, आरती शेंडगे, भाग्यश्री धायगुडे, धनवान वदक, कमल हिंगणे, संगीता ढवाण, नूसरत इनामदार, दीपाली पवार, हेमलता निंबाळकर, मनीषा रासकर, सुमन साळोखे उपस्थित होते.
——————————————————
फोटोओळी—बारामतीतील निर्मिती व सावित्रीबाई फुले महिला बचत गटाच्या माध्यमातून तालुका महिला शिवभोजन थाळी केंद्राचे उद्घाटन बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले.
१३०७२०२१ बारामती—३३
———————————————