४४९ म्युकरमायकोसिस रुग्णांना ‘जनआरोग्य योजने’चा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:09 IST2021-06-11T04:09:18+5:302021-06-11T04:09:18+5:30
पुणे : शासनाने जाहीर केल्याप्रमाणे म्युकरमायकोसिस रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील ४४९ म्युकरमायकोसिस रुग्णांना आतापर्यंत ...

४४९ म्युकरमायकोसिस रुग्णांना ‘जनआरोग्य योजने’चा लाभ
पुणे : शासनाने जाहीर केल्याप्रमाणे म्युकरमायकोसिस रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील ४४९ म्युकरमायकोसिस रुग्णांना आतापर्यंत महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून लाभ देण्यात आला आहे.
जिल्ह्यात कोरोना महामारी काळात १ एप्रिलपासून आजपर्यंत या योजनेमधून ३१ हजार ८२१ पूर्ण रुग्णांवर उपचार करण्यात आले असून ५१ कोटी १७ लाख रुपयांचे क्लेम मंजूर करण्यात आले आहेत. कोरोना, म्युकरमायकोसिस बरोबरच अन्य रुग्णांनादेखील महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून लाभ दिले जातात. पुणे जिल्ह्यात एप्रिल २०२० पासून आजपर्यंत सर्व प्रकारच्या ७१ हजार ७८५ रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला असून, त्यापोटी १९८ कोटी ५८ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यात म्युकरमायकोसिस रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून या रुग्णांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत खर्च विमा रकमेतून दिला जातो आणि त्या पुढे होणारा सर्व खर्च हा राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत देण्याची योजना आहे. म्युकरमायकोसिस पुण्यात या योजनेचा लाभ होणार आहे ४४९ रुपये असून त्यातील सर्वाधिक २३० रुग्ण ससून रुग्णालयात आहेत. तर १२८ रुग्ण पिंपरी-चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये दाखल आहेत.
पुणे शहरामध्ये महापालिका क्षेत्रात २० रुग्णालये या योजनेखाली येतात. त्यामध्ये चार शासकीय आणि १६ खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. तर पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण आठ रुग्णालय असून त्यामधील दोन शासकीय आणि सहा खासगी रुग्णालये तर ग्रामीण भागामध्ये ५० रुग्णालय या योजनेमध्ये असून त्यामध्ये आठ शासकीय रुग्णालयांचा समावेश आहे.