ऑनलाइन अनुदान वाटपामुळे लाभार्थ्यांना थेट फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:13 IST2021-06-09T04:13:32+5:302021-06-09T04:13:32+5:30
इंदापूर : शासनाच्या कृषी विभागाच्या अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण ऑनलाइनद्वारे, शेतकरी लाभार्थ्यांना ट्रॅक्टर व शेती अवजारे यासाठी थेट अनुदान प्राप्त ...

ऑनलाइन अनुदान वाटपामुळे लाभार्थ्यांना थेट फायदा
इंदापूर : शासनाच्या कृषी विभागाच्या अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण ऑनलाइनद्वारे, शेतकरी लाभार्थ्यांना ट्रॅक्टर व शेती अवजारे यासाठी थेट अनुदान प्राप्त झाले असल्याने, इंदापूर तालुका कृषी विभागाच्या वतीने लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर अवजारे मिळाली आहेत. यामुळे शेती अद्ययावत पद्धतीने कसण्यासाठी या कृषी विभागाच्या योजनेचा गरीब शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
इंदापूर येथील पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या आवारात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते, कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेअंतर्गत शनिवारी लाभार्थी शेतकऱ्यांना अवजारे ट्रॅक्टर वाटप केले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे-पाटील, तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, इंदापूर तालुका कृषी कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.
शासनाच्या कृषी विभागाच्या अनेक लहान-मोठ्या योजना इंदापूर कृषी विभागात राबवल्या जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या योजनांचा फायदा होत असून, शेतात असणाऱ्या विविध प्रकारच्या बागा व अद्ययावत शेती यासाठी कृषी विभागाच्या संपर्कात शेतकऱ्यांनी सातत्याने राहून, आणखी योजनांचा फायदा घ्यावा असेही आवाहन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
०७ इंदापूर ॲग्री
इंदापूर येथे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर अवजारे प्रदान करताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व मान्यवर.