संत निरंकारी मिशनच्या वतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:08 IST2021-07-02T04:08:49+5:302021-07-02T04:08:49+5:30

बारामती : संत निरंकारी मिशनच्या विद्यमान सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आदेशानुसार व सातारा झोनचे झोनल प्रमुख नंदकुमार झांबरे ...

On behalf of Sant Nirankari Mission | संत निरंकारी मिशनच्या वतीने

संत निरंकारी मिशनच्या वतीने

बारामती : संत निरंकारी मिशनच्या विद्यमान सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आदेशानुसार व सातारा झोनचे झोनल प्रमुख नंदकुमार झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली तर बारामती क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक किशोर माने यांच्या सहकार्याने रविवारी (ता. ४) सकाळी ९ ते ४ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

सदरचे शिबिर खंडोबानगर येथील सत्संग भवनात होणार आहे. संत निरंकारी मिशन अध्यात्माबरोबर आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत मदत, कोविड-१९ परिस्थितीमध्ये मदतकार्य आदी सामाजिक कार्य जोपासत असल्याचे मिशनचा नावलौकिक आहे.

या शिबिरात निरंकारी अनुयायांबरोबर इतरांनीही उत्स्फूर्तपणे रक्तदान करावे, असे आवाहन झांबरे यांनी केले आहे. सदरचे शिबिर शासनाच्या नियमांचे पूर्णपणे पालन करून मंडळाच्या आदेशान्वये पार पडणार असल्याचे झांबरे यांनी सांगितले.

Web Title: On behalf of Sant Nirankari Mission