शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जंबो लसीकरण केंद्र सुरु करा: भाजप नगरसेवकाची महापौरांकडे मागणी.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 19:26 IST

मुंबईचा धर्तीवर जम्बो लसीकरण केंद्र सुरु करावे नगरसेवकाची भूमिका.

ठळक मुद्देजम्बो कोव्हीड लस सेंटर नागरिकांना ठरेल फायदेशीर

पुणे शहराला लवकरात लवकर कोव्हिड मुक्त करण्यासाठी जम्बो कोव्हिड सेंटरच्या धर्तीवर जम्बो लसीकरण केंद्र उभारण्याची मागणी  पुण्यातील भाजप नगरसेवकाने केली आहे. नगरसेवक आदित्य माळवेयांनी महापौरांना पत्र देत लवकरात लवकर या मागणीची दखल घ्यावी अशी विनंती केली आहे. या केंद्रावर  जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होऊ शकते ,तसेच लसीच्या क्षमतेचा साठाही मोठ्या प्रमाणावर करता येऊ शकतो ,त्यामुळे असे केंद्र महापालिकेने सुरु करावे अशी त्यांची भूमिका आहे. 

गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यातच लसीकरण केंद्र सुरु झालेली असली तरी तिथे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर या केंद्राची गरज आहे. मार्च महिन्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. एका दिवसाला ७००, ८०० च्या दरम्यान रुग्ण आढळून येत होते. पण सद्यस्थितीत तोच आकडा तीन हजारांच्या आसपास पोहोचला आहे. त्यामध्ये ८० ते ८५ टक्के रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. मात्र रुग्णांची संख्या थांबण्याचे नाव घेत नाहीये. म्हणून महापालिकेने सोमवारपासून जम्बो कोव्हिडं सेंटर सुरू केले आहे. त्याच प्राश्वभूमीवर असे लसीकरण केंद्र देखील सुरु केले जावे अशी मागणी माळवे यांनी केली आहे. 

एकीकडे महापालिका रुग्णालयातील बेड वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. तर दुसरीकडे लसीकरण मोहिमेलाही वेगाने सुरुवात झाली आहे. शहरातील सरकारी रुग्णालयाबरोबरच खासगी रुग्णालयातही लसीकरण चालू आहे. कोव्हक्सिन आणि कोव्हीशिल्ड अशा दोन प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत. तीन टप्प्यापर्यंत लसीकरण येऊन पोहोचले आहे.

आता एक एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी लसीकरण चालू होणार आहे. पुढच्या महिन्यापासून शहरातील रुग्णालये आणि लसीकरण केंद्र यांच्यावर ताण येण्याची शक्यता आहे. जम्बो लसीकरण केंद्र चालू केल्याने नागरिकांना आणि महापालिका दोघांनाही फायदा होण्याची शक्यता आहे. तसेच महापालिकेवर अतिरिक्त कामाचा ताणही येणार नाही. 

टॅग्स :PuneपुणेMayorमहापौरCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या