लासुर्णेमधून लाळखुरकत लसीकरणास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:10 IST2021-09-19T04:10:48+5:302021-09-19T04:10:48+5:30

लसीकरण कार्यक्रम पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद, पुणे व पंचायत समिती, इंदापूर यांच्यातर्फे संपूर्ण तालुक्यात राबविला जात आहे. तालुक्यात ...

Beginning of salivary vaccination from measles | लासुर्णेमधून लाळखुरकत लसीकरणास सुरुवात

लासुर्णेमधून लाळखुरकत लसीकरणास सुरुवात

लसीकरण कार्यक्रम पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद, पुणे व पंचायत समिती, इंदापूर यांच्यातर्फे संपूर्ण तालुक्यात राबविला जात आहे. तालुक्यात एकूण मोठी जनावरे एक लाख ७० हजार ४६५ एवढी असून, सदर जनावरांसाठी एकूण एक लाख ५८ हजार लाळखुरकत लसमात्रा इंदापूर तालुक्यासाठी प्राप्त झाली आहे. लस तालुक्यांमधील संपूर्ण मोठ्या जनावरांना टोचली जाणार आहे. लाळखुरकत लसीकरण दुसरी फेरी २१ दिवसांमध्ये तालुक्यात पूर्ण करण्यात येणार आहे. तालुक्यामध्ये सध्या ठरावीक भागात लाळखुरकत रोगाची लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे सदर लस ही तालुक्यासाठी वरदान ठरणार आहे. सदर कार्यक्रमात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तालुक्यातील संपूर्ण पशुपालकांनी सर्व जनावरांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले.

यावेळी छत्रपती कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सपकाळ, छत्रपतींचे संचालक बाळासो सपकाळ, लासुर्णेचे उपसरपंच उल्हास जाचक, ग्रामपंचायत सदस्य अमित चव्हाण, निखिल भोसले व तुकाराम देवकाते, आदी उपस्थित होते. तसेच पशुसंवर्धन विभागाचे पशुधन विकास अधिकारी डॉ. रामचंद्र शिंदे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भीमराव जानकर, डॉ. संजय पराडे, डॉ. अभिजित आटोळे, डॉ. हनुमंत हेंद्रे, डॉ. सुनील वाघमोडे उपस्थित होते.

लासुर्णेत लाळखुरकत लसीकरणाच्या दुसऱ्या फेरीची सुरुवात करताना दत्तात्रय भरणे व इतर.

१८०९२०२१-बारामती-०६

Web Title: Beginning of salivary vaccination from measles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.