पुणे : सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिराच्या ब्रह्मोत्सवास काल सोमवारी सायंकाळी पारंपरिक पद्धतीने उत्साहाच्या वातावरणात प्रारंभ झाला.महालक्ष्मी मंदिराच्या ३४व्या वर्धापनदिनानिमित्त श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागतर्फे दिनांक २२ जानेवारी ते २४ जानेवारीपर्यंत ३ दिवस ब्रह्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. काल सोमवारी सायंकाळी ७ वाजता राजस्थान मधील डिडवाना येथील झालरीया पिठाचे महंत घनश्यामाचार्यजी महाराज व स्वामीजी श्री भुदेवाचार्यजी महाराज यांच्या उपस्थित मंदिराचे प्रमुख विशवस्त श्री राजकुमारजी अगरवाल व त्यांच्या पत्नी अमिता अगरवाल यांच्या हस्ते कळस स्थापना आणि गरुड ध्वजाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर श्री महालक्ष्मी देवी, सरस्वतीदेवी आणि कालीमातेची पवित्र मंत्रोपचाराने धार्मिक पूजा उत्साहाच्या वातावरणात करण्यात आली. यानंतर भाविकांनी अभिषेक केले. याप्रसंगी मंदिराचे विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर, तृप्ती अगरवाल, रमेश पाटोडीया आदी उपस्थित होते.
सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिराच्या ब्रह्मोत्सवास पारंपरिक उत्साहात सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 14:24 IST
सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिराच्या ब्रह्मोत्सवास काल सोमवारी सायंकाळी पारंपरिक पद्धतीने उत्साहाच्या वातावरणात प्रारंभ झाला.
सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिराच्या ब्रह्मोत्सवास पारंपरिक उत्साहात सुरूवात
ठळक मुद्दे२२ जानेवारी ते २४ जानेवारीपर्यंत ३ दिवस ब्रह्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रममहालक्ष्मी मंदिराच्या ३४व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजन