Sinhgad Pune News: शनिवार, रविवारी सिंहगडावर जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. अनेक जण किल्ला पाहायला जात असतात. अनेक दुर्गप्रेमीही आवर्जून सिंहगडावर जात असतात. यातच काही वेळापूर्वी सिंहगडावर आलेल्या पर्यटकांवर मधमाश्यांनी हल्ला केल्याचे म्हटले जात आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सिंहगडावर वरती मधमाशांचा हल्ला झाला असून, काही पर्यटकांना मधमाशा चावल्या आहेत. थोड्याच वेळामध्ये आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी पोहोचत आहे. मधमशांच्या या हल्ल्यामुळे सिंहगडावर एकच गोंधळ उडाला. ज्यांना मधमाशा चावल्या, अशांना तातडीने खाली आणून पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सुमारे ७ ते ८ जणांना तत्काळ रुग्णालयात दाखल
सिंहगडावरील पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला गेल्याचे समजताच अनेक जण मदतीला धावून आले. गडावरून खाली उतरायला, तसेच रुग्णालयात जाण्यासाठी मदत केली. अनेक पर्यटकांना खासगी वाहनांनी रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यात आले. जशी जमेल, तशी मदत केली जात आहे. सुमारे ७ ते ८ जणांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दीड वर्षाच्या चिमुकल्यालाही चावल्या; उपचार सुरू
युवाश ऋषिकेश सोनार या दीड वर्षाच्या बाळाला किल्ले सिंहगड येथे आगी मोहोळाच्या माशा चावल्या. बाळाचे वडील ऋषिकेश नरेंद्र सोनार, निधी ऋषिकेश सोनार, कविता प्रसाद सोनार, अंश प्रसाद सोनार यांना आगी मोहाळाच्या माशा चावल्या. त्यांना सुखरूप दवाखान्यापर्यंत पोहोचवण्यात आले आहे. तसेच ६४ वर्षांच्या नंदकुमार शिदू घारघे या आजोबांनाही मोठ्या प्रमाणात मधमाशा चावल्या आहेत. हे आजोबा साताऱ्याचे आहेत.
Web Summary : Tourists at Sinhgad Fort were attacked by bees, resulting in injuries. A one-and-a-half-year-old child and several others were stung and hospitalized. Rescue efforts were swift, with many transported to hospitals for treatment. The incident caused chaos at the popular tourist spot.
Web Summary : सिंहगढ़ किले में पर्यटकों पर मधुमक्खियों ने हमला किया, जिससे कई घायल हो गए। डेढ़ साल का बच्चा और कई अन्य लोगों को काटा गया और अस्पताल में भर्ती कराया गया। बचाव कार्य तेजी से किया गया, कई लोगों को इलाज के लिए अस्पताल पहुंचाया गया। घटना से लोकप्रिय पर्यटन स्थल पर अराजकता फैल गई।