शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
2
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
3
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
4
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
7
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
8
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
9
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
10
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
11
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
12
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
13
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
14
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
15
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
16
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
17
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
18
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
19
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
20
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय

Crime News| बीडच्या कुख्यात गुंडाला चाकणमध्ये ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 10:06 IST

या आरोपीवर खुनाचा प्रयत्न, जबरी चोऱ्या असे २० पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत

चाकण : बीड पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरारी झालेल्या कुख्यात गुन्हेगारास चाकण वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून प्रचंड वाहतूक कोंडी असलेल्या चाकणच्या तळेगाव चौकात मोठ्या शिताफीने अटक करून बीड पोलिसांच्या ताब्यात दिले. बीड जिल्हा गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुविख्यात गुन्हेगार संजय रामदास पवार (रा.बीड ) हा स्कॉर्पिओ गाडी क्रमांक (एम एच.०६बीएम २४७७ ) मधून भोसरी ते चाकण मार्गे जात होता.

या आरोपीवर खुनाचा प्रयत्न, जबरी चोऱ्या असे २० पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. बीड पोलिसांचे एलसीबी पथक भोसरी येथे याच आरोपीच्या मागावर आले होते. मात्र त्यांना गुंगारा देऊन संबंधित आरोपी पुणे नाशिक महामार्गाने स्कॉर्पिओ वाहनातून पळून जात होता. अशी माहिती बीड एलसीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक दुलत यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तलयातील चाकण वाहतूक शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक नम्रता डावरे यांच्याशी संपर्क साधून वरील चारचाकी स्कॉर्पिओ वाहनातून पळून जाणाऱ्या गुन्हेगाराची माहिती दिली.

पोलीस उपनिरीक्षक नम्रता डावरे यांनी अनंत रावण,वैशाली पानसरे, प्रवीण कासार,चंद्रकांत गाडे,प्रकाश वाजे,खेडकर या आपल्या सहकार्यांना सगळी माहिती देऊन तळेगाव चौकात सापळा रचून संजय पवारला वाहनासह पकडण्यात पोलिसांना यश आले.

टॅग्स :PuneपुणेChakanचाकणCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड