इंजिनिअरिंगचा विद्यार्थी बनला पिस्तूल तस्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:16 IST2021-03-13T04:16:55+5:302021-03-13T04:16:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यात इंजिनिअरिंगसाठी आलेला तरुण पिस्तूल तस्कर बनल्याचा प्रकार गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने उघडकीस आणला ...

Became an engineering student and became a pistol smuggler | इंजिनिअरिंगचा विद्यार्थी बनला पिस्तूल तस्कर

इंजिनिअरिंगचा विद्यार्थी बनला पिस्तूल तस्कर

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुण्यात इंजिनिअरिंगसाठी आलेला तरुण पिस्तूल तस्कर बनल्याचा प्रकार गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने उघडकीस आणला आहे. मध्य प्रदेशातून पिस्तूल घेऊन ती पुण्यातील गुन्हेगारांना गेली ४ वर्षे विक्री करीत होता. त्याच्यासह पोलिसांनी चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून साडेचार लाख रुपयांची ८ पिस्तूल आणि १५ जिवंत काडतुसे जप्त केली असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

मूख्य सूत्रधार भूषण महेश मराठे (वय २३, रा. अरुणनगर, चोपडा, जि. जळगाव), राहुल चंद्रकांत पवार (२६), तौफिक गुलाब शेख (वय २५, रा. कामगार पुतळा, शिवाजीनगर) आणि राम गोरोबा जाधव (वय ३५, रा. दांडेकर पूल, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पवार याच्यावर राजगड पोलीस ठाण्यात ५ गंभीर स्वरूपाचे तर जाधव याच्यावर राजगड पोलीस ठाण्यात खुनाचा एक गुन्हा दाखल आहे.

शहरात शस्त्रविक्री करणाऱ्यांचा डाटा संकलित करुन त्यांच्याकडे तपास करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला होता. खंडणी विरोधी पथक दोन शहरातील पिस्तूल प्रकरणांचा डाटा संकलित करून तपास करीत असताना पोलिस अंमलदार सचिन अहिवळे यांना माहिती मिळाली. जळगाव येथून एक जण देशी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी पुण्यात येणार असल्याचे समजले. त्यानुसार पुणे रेल्वे स्टेशन परिसरात पथकाने सापळा लावून भूषण मराठे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे ३ पिस्तुले, ६ जिवंत काडतुसे मिळाली. त्याच्याकडे अधिक तपास केल्यानंतर पुण्यात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना तो इतर आरोपींच्या संपर्कात आल्याचे सांगितले. त्याचे जळगाव जिल्ह्यातील चोपडा गाव हे मध्य प्रदेश सीमेपासून १५ ते २० किमी अंतरावर आहे. तेथूनच १० ते १५ हजार रूपयांना पिस्तुले विकत घेऊन तो पुणे शहरात ती पिस्तुले ३० ते ५० हजार रूपयांपर्यंत विकत होता असे सांगण्यात आले.

Web Title: Became an engineering student and became a pistol smuggler